मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  नवऱ्याशी भांडून मुलांसह विहिरीत उडी मारली, भीती वाटताच निघाली बाहेर; तोपर्यंत मोठा अनर्थ घडला!

नवऱ्याशी भांडून मुलांसह विहिरीत उडी मारली, भीती वाटताच निघाली बाहेर; तोपर्यंत मोठा अनर्थ घडला!

Mar 27, 2023, 01:46 PM IST

  • Madhya Pradesh Shocking: मध्य प्रदेशात नवऱ्यासोबत झालेल्या भांडणातून महिलेने पोटच्या चार मुलांसह विहिरीत उडी घेतली.

Madhya Pradesh

Madhya Pradesh Shocking: मध्य प्रदेशात नवऱ्यासोबत झालेल्या भांडणातून महिलेने पोटच्या चार मुलांसह विहिरीत उडी घेतली.

  • Madhya Pradesh Shocking: मध्य प्रदेशात नवऱ्यासोबत झालेल्या भांडणातून महिलेने पोटच्या चार मुलांसह विहिरीत उडी घेतली.

Madhya Pradesh News: नवऱ्याशी झालेल्या भांडणातून एका महिलेने पोटच्या चार मुलांसह विहिरीत उडी घेतली. मात्र, विहिरीत उडी घेतल्यानंतर महिला जगण्यासाठी धडपड करू लागली. त्यानंतर मोठ्या मुलीचा हात पकडून विहिरीत लटकणाऱ्या रश्शीला पकडून ती विहिरीबाहेर आली. मात्र, या घटनेत तिच्या तीन मुलांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही भयानक घटना मध्ये प्रदेशातील बुऱ्हाणपुरमध्ये घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.

ट्रेंडिंग न्यूज

25 virgin girls : हुकूमशहा किम जोंग वर्षाला २५ ‘व्हर्जिन’ मुलींशी ठेवतो लैंगिक संबंध; चालवतो प्लेजर स्क्वॉड

Covaxin : कोवॅक्सिन लस किती सुरक्षित? कोविशील्डचा वाद सुरू असताना भारत बायोटेकनं दिली महत्त्वाची माहिती; वाचा

Google Chrome : गुगल क्रोम वापरत असाल तर तातडीनं करा 'हे' काम, नाहीतर रस्त्यावर याल!

NEET UG Hall Ticket 2024: नीट यूजी परीक्षा प्रवेशपत्र जारी; ‘या’ लिंकवरून करा डाउनलोड, जाणून घ्या परीक्षेची तारीख

मिळालेल्या माहितीनुसार, प्रमिला भिलाला असे संबंधित महिलेचे नाव आहे. पती रमेश सोबत भांडण झाल्यानंतर प्रमिलाने आपल्या चार मुलांसह विहिरीत उडी घेतली. त्यानंतर तिला भीती वाटली व ती विहिरीत बाहेर पडण्यासाठी धडपडत होती. त्याचवेळी तिने तिच्या मोठ्या मुलीचा हात पकडून विहिरीला लटकणाऱ्या रश्शीला पकडून विहिरीबाहेर आली. मात्र, या घटनेत तिच्या तीन मुलांचा मृत्यू झाला आहे. प्रमिला आणि तिची मोठी मुलगी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीच्या झालेल्या भांडणानंतर या महिलेने तिच्या चारही मुलांसोबत घराजवळच्या विहिरीत उडी घेतली. मात्र, तिला आपली चूक लक्षात येताच तिने स्वत:सह मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिला फक्त मोठ्या मुलीला वाचवण्यात यश आले. या घटनेत या महिलेच्या पाच वर्षाची मुलगी, तीन वर्षांची मुलगी आणि १८ महिन्यांचा मुलाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.