मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Mobile Explosion: चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट; वृद्ध व्यक्तीचा जागीच मृत्यू

Mobile Explosion: चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट; वृद्ध व्यक्तीचा जागीच मृत्यू

Feb 27, 2023, 11:07 PM IST

  • Madhya Pradesh Shocking: मध्य प्रेदशमध्ये मोबाईल चार्जिंग लावून त्याचा वापर करताना झालेल्या स्फोटात एका वृद्ध व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे.

Mobile Explosion

Madhya Pradesh Shocking: मध्य प्रेदशमध्ये मोबाईल चार्जिंग लावून त्याचा वापर करताना झालेल्या स्फोटात एका वृद्ध व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे.

  • Madhya Pradesh Shocking: मध्य प्रेदशमध्ये मोबाईल चार्जिंग लावून त्याचा वापर करताना झालेल्या स्फोटात एका वृद्ध व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे.

Madhya Pradesh Mobile Explosion: मध्य प्रदेशच्या उज्जैन जिल्ह्यात चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट झाल्याने एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला. या स्फोटाची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती फोन चार्जिंगला लावून व्हिडिओ पाहत होता. मात्र, त्यावेळीच स्फोट झाल्याने संबंधित व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

NEET UG Hall Ticket 2024: नीट यूजी परीक्षा प्रवेशपत्र जारी; ‘या’ लिंकवरून करा डाउनलोड, जाणून घ्या परीक्षेची तारीख

Viral VIDEO : बाप की हैवान? मुलाचा घेतला जीव, वजन जास्त असल्यानं जीममध्ये नेऊन ट्रेडमशिनवर पळवलं अन्…

IITमध्ये शिकणाऱ्या ११५ विद्यार्थ्यांनी केली आत्महत्या; २० वर्षातली धक्कादायक आकडेवारी जाहीर

पाकिस्तान आर्मीचे हेलिकॉप्टर वाळवत आहेत गव्हाची शेतं, पंतप्रधान शहबाज यांची उडवली जातेय खिल्ली, VIDEO

दयाराम असे मोबाईल स्फोटात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दयाराम हा उजैन जिल्ह्यातील एका दुकानात एकटाच राहायचा. दरम्यान, मोबाईल चार्जिंगला लावून व्हिडिओ पाहत होता. मात्र, त्याचवेळी मोबाईलचा स्फोट झाला. या स्फोटानंतर वृद्धांच्या शरीरात मोबाईलचे अनेक तुकडे आढळून आले. यावेळी त्याच्या मानेवर आणि छातीवर गंभीर जखम झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

या घटनेची माहिती मिळताच बडनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवला आहे, अशी माहिती बडनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी मनीष मिश्रा यांनी दिली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

यापूर्वी मोबाईल चार्जिंगला लावून त्याचा वापर करत असताना ब्लास्ट झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. ज्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागलेत. मात्र, तरीही काहीजण अशा घटनेला गांभीर्याने घेत नाहीत.