मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Imran Khan: इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकही श्रीलंकेच्या वाटेवर! जमावावर गोळीबार, PTI समर्थकांचा ISI मुख्यालयावर हल्ला

Imran Khan: इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकही श्रीलंकेच्या वाटेवर! जमावावर गोळीबार, PTI समर्थकांचा ISI मुख्यालयावर हल्ला

May 09, 2023, 10:28 PM IST

  • Imran khan arrested : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान व पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांना आज अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांचे समर्थक आक्रमक झाले असून त्यांनी लष्कराच्या मुख्यालयावर हल्लाबोल केला आहे.

Imran khan arrested

Imran khan arrested : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान व पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांना आज अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांचे समर्थक आक्रमक झाले असून त्यांनी लष्कराच्या मुख्यालयावर हल्लाबोल केला आहे.

  • Imran khan arrested : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान व पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांना आज अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांचे समर्थक आक्रमक झाले असून त्यांनी लष्कराच्या मुख्यालयावर हल्लाबोल केला आहे.

आधीच अर्थव्यवस्था डबघाईला आलेल्या पाकिस्तानची स्थिती इम्रान खान यांच्या अटकेनंतर खूपच खराब झाली आहे. पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच असे झाले आहे की, जनता लष्कराच्या मुख्यालयात घुसली आहे. त्याचबरोबर आंदोलनकर्ते लष्कराच्या कोअर कमांडरच्या घरातही घुसले आहेत. त्याचबरोबर आयएसआयच्या मुख्यालयावर हल्लाबोल केला आहे. जनतेबरोबरच्या या लडाईत पाकिस्तान लष्कर पूर्णपणे हतबल दिसत असून बॅकफुटवर आले आहे. सैनिकांनी केलेल्या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अशावेळी शंका उपस्थित केली जात आहे की, पाकिस्तानची अवस्थाही श्रीलंकेसारखी होऊ शकते. श्रीलंकेतही संतप्त जनतेने राष्ट्रपतीच्या निवासस्थानी घुसून हल्ला केला होता. अशीच घटना पाकिस्तानमध्ये घडली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

India Post Office Recruitment: भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये 'या' पदांवर भरती; ८३ हजारापर्यंत पगार मिळणार!

Viral Video: पतीचे दोन्ही हात बांधून दिले सिगारेटचे चटके, नंतर चाकूनं प्रायव्हेट पार्ट कापण्याचा प्रयत्न, पत्नीला अटक

Viral Video : ७५ लाख किंमतीच्या कारमध्ये फिरते वडापाव विकणारी तरुणी; हे कसं घडलं?

Air India Express Flight: एअर इंडिया एक्सप्रेसचे ७८ उड्डाणं अचानक रद्द ! आजारी असल्याचे कारण देत क्रू मेंबर्स गेले रजेवर

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान व पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांना आज अटक करण्यात आली. पाकिस्तानी रेंजर्सनी इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या बाहेरून इम्रान यांना अटक केली.

इम्रान खान यांच्या अटकेचे व्हिडिओ त्यांच्या पक्षाच्या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आले आहेत. यात पाक रेंजर्सनं माजी पंतप्रधानांना ओढत नेऊन कारमध्ये बसवलं. त्यांच्या अटकेनंतर संपूर्ण पाकिस्तानात तणावाचं वातावरण असून जनतेमध्ये उद्रेक झाल्याचं पाहायला मिळत आहे. पाकिस्तानात कलम १४४ लागू करण्यात आलं आहे.

इम्रान खान यांनी अटकेच्या दोन दिवस आधी पाक लष्करावर त्यांच्या कथितरित्या हत्येचा कट रचण्याचा आरोप केला होता. आयएसआयच्या एका अधिकाऱ्यानं या आरोपांचं खंडन केलं होतं. दरम्यान, इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानात त्यांच्या समर्थकांद्वारे मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. तसंच आंदोलक पाकिस्तानी लष्कराचे कोअर कमांडर यांच्या घरातही शिरले.

तर दुसरीकडे लाहोरशिवाय इम्रान खान यांच्या समर्थकांनी रावळपिंडीतील लष्कराच्या मुख्यालयावरही हल्ला केला. त्यांना सोडण्यात येत नाही तोवर आपण या ठिकाणाहून जाणार नसल्याचा पवित्राही त्यांच्या समर्थकांनी घेतला आहे.

विभाग