मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Congress vs BJP: ‘मोदी-शहांनी दररोज २४ किमी चालून दाखवावं’, भाजपच्या आरोपांना कॉंग्रेसचं प्रत्युत्तर

Congress vs BJP: ‘मोदी-शहांनी दररोज २४ किमी चालून दाखवावं’, भाजपच्या आरोपांना कॉंग्रेसचं प्रत्युत्तर

Dec 04, 2022, 12:52 PM IST

    • Bharat Jodo Yatra : गुजरात निवडणुकीच्या प्रचारात पीएम मोदींनी कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेला इव्हेंट म्हटलं होतं. त्यानंतर आता कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा एक किस्सा सांगत मोदींवर सडकून टीका केली आहे.
Congress vs BJP On Bharat Jodo Yatra (HT)

Bharat Jodo Yatra : गुजरात निवडणुकीच्या प्रचारात पीएम मोदींनी कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेला इव्हेंट म्हटलं होतं. त्यानंतर आता कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा एक किस्सा सांगत मोदींवर सडकून टीका केली आहे.

    • Bharat Jodo Yatra : गुजरात निवडणुकीच्या प्रचारात पीएम मोदींनी कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेला इव्हेंट म्हटलं होतं. त्यानंतर आता कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा एक किस्सा सांगत मोदींवर सडकून टीका केली आहे.

Congress vs BJP On Bharat Jodo Yatra : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर आता भारत जोडो यात्रेवरून कॉंग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या आहेत. गुजरातमध्ये निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा इव्हेंट असा उल्लेख केला होता. त्यानंतर आता कॉंग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी पत्रकार परिषद घेत भाजपच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Covaxin : कोवॅक्सिन लस किती सुरक्षित? कोविशील्डचा वाद सुरू असताना भारत बायोटेकनं दिली महत्त्वाची माहिती; वाचा

Google Chrome : गुगल क्रोम वापरत असाल तर तातडीनं करा 'हे' काम, नाहीतर रस्त्यावर याल!

NEET UG Hall Ticket 2024: नीट यूजी परीक्षा प्रवेशपत्र जारी; ‘या’ लिंकवरून करा डाउनलोड, जाणून घ्या परीक्षेची तारीख

Viral VIDEO : बाप की हैवान? मुलाचा घेतला जीव, वजन जास्त असल्यानं जीममध्ये नेऊन ट्रेडमशिनवर पळवलं अन्…

माध्यमांशी बोलताना कॉंग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, भारत जोडो यात्रा ही मुव्हमेंट आहे इव्हेंट नाही. कॉंग्रेस आणि भारतीय राजकारणातील हा परिवर्तनकारी क्षण असून कोणताही इव्हेंट हा १४० दिवस चालत नाही. तीन चार तासांसाठी किंवा चार तासांसाठी इव्हेंट होत असतो. भारत जोडो पदयात्रा इव्हेंट असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी दररोज २४ किलोमीटर चालून दाखवावं, असं आव्हान कॉंग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी भाजपला दिलं आहे.

लालकृष्ण अडवाणींचा तो किस्सा सांगत कॉंग्रेसची मोदींवर टीका...

पाच फेब्रुवारी २०१७ साली लालकृष्ण अडवाणी हे गुजरातमधील गांधीनगरमध्ये निवडणुकीसाठी अर्ज भरायला गेले होते. त्यावेळी त्यांना काही पत्रकारांनी मोदी तुमचे शिष्य आहेत का?, असा प्रश्न विचारला. त्यावेळी त्याला उत्तर देताना अडवाणी म्हणाले की, नरेंद्र मोदी हे माझे शिष्य नसून ते जगातील सर्वात चांगले इव्हेंट मॅनेजर आहे. त्यामुळं ज्या लोकांचा इव्हेंट मॅनेज करण्यात हातखंडा आहे, त्या लोकांनी आमच्यावर इव्हेंट मॅनेजमेंटचा आरोप करू नये. १४० दिवस १२ राज्यांमध्ये चालत पदयात्रा काढणं हा इव्हेंट असू शकत नाही, असं म्हणत कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे.