मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Road Accident : गुवाहाटी येथे भीषण अपघात ७ इंजिनियर विद्यार्थी जागीच ठार; ६ जण जखमी

Road Accident : गुवाहाटी येथे भीषण अपघात ७ इंजिनियर विद्यार्थी जागीच ठार; ६ जण जखमी

May 29, 2023, 10:59 AM IST

    • Road Accident : आसामच्या गुवाहाटी येथे एका अपघात ७ इंजिनियर विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या अपघात ६ जण जखमी झाले आहेत.
Road Accident :

Road Accident : आसामच्या गुवाहाटी येथे एका अपघात ७ इंजिनियर विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या अपघात ६ जण जखमी झाले आहेत.

    • Road Accident : आसामच्या गुवाहाटी येथे एका अपघात ७ इंजिनियर विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या अपघात ६ जण जखमी झाले आहेत.

Road Accident : गुवाहाटी येथील जलुकबारी येथील डीसीपी कार्यालयासमोर रविवारी रात्री भीषण अपघात झाला. या अपघातात ७ इंजिनियर विद्यार्थी ठार झाले तर ६ जण जखमी झाले. या विद्यार्थ्यांची कार दुभाजकावर आदळली आणि नंतर दुसऱ्या गाडीला धडकली. त्यांची गाडी भरधाव वेगात असल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या अपघातानंतर साधारण दोन तास वाहतूक विस्कळीत झाली होती. हळूहळू वाहतूक पूर्वपदावर करण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

UP Mobile Blast News: ईअरफोन लावून बाईक चालवत होती महिला, तितक्यात मोबाईलचा स्फोट झाला अन्...

UP : उत्तर पत्रिकेत 'जय श्रीराम' आणि क्रिकेटपटूंची नावं लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांना पास केलं; प्राध्यापकांची हकालपट्टी

Viral News : मैत्रिणीसाठी ऑर्डर केलेला बर्गर मित्राने अर्धा खाल्ला; संतापलेल्या दोस्ताने केली हत्या

Patna Hotels Fire: पाटणा रेल्वे स्थानकाजवळील हॉटेल्सना भीषण आग, ६ जणांचा होरपळून मृत्यू; मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

निओर डेका, उपांशु शर्मा, कौशिक बरुआ, कौशिक मोहन, राज किरण भुइयां, एमोन बरुआ, अरिंदम भौवाल अशी मृत विद्यार्थ्यांची नावं आहेत. तर या अपघातात इतर ६ जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. छात्र मृण्मय बोरा, अर्नव चक्रवर्ती आणि अर्पण भुइयां घायल अशी जखमी विद्यार्थ्यांची नावे आहेत.

बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्कोंवर विष प्रयोग ? पुतिन यांची भेट घेतल्यावर थेट रुग्णालयात दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भरधाव वेगात असलेल्या महिंद्रा स्कॉर्पिओने ब्रॉयलर घेऊन जाणाऱ्या बोलेरो पिकअप व्हॅनला धडक दिली. या अपघातात ७ विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. आसाम अभियांत्रिकी महाविद्यालयातील सहाव्या सत्रात हे विद्यार्थी शिक्षण घेत होते. ते विद्यालयाच्या वसतिगृह क्रमांक २ राहत होते.

 

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर मृतदेह ताब्यात घेतले असून रुग्णालयात शवविच्छेदन अहवालासाठी पाठवून देण्यात आलं आहे.

विद्यार्थ्यांच्या स्कॉर्पिओ ही भरधाव वेगात होती. हा वेग नियंत्रणात न आल्याने गाडी पुढे गेली आणि दुसऱ्या लेनमधून जाणाऱ्या पिकअप वाहनावर आदळली.

विभाग