मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  काँग्रेस आमदाराच्या जावयाला अटक, ६ जणांना गाडीने चिरडले

काँग्रेस आमदाराच्या जावयाला अटक, ६ जणांना गाडीने चिरडले

Aug 12, 2022, 08:17 AM IST

    • Car Accident: कारने धडक दिल्याने रिक्षातील चौघे तर दुचाकीवर असलेल्या दोघांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर आमदाराचा जावई पळून गेला होता, त्याला पोलिसांनी अटक केलीय.
गुजरातमध्ये भीषण अपघात, ६ जणांचा मृत्यू (फोटो - एएनआय)

Car Accident: कारने धडक दिल्याने रिक्षातील चौघे तर दुचाकीवर असलेल्या दोघांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर आमदाराचा जावई पळून गेला होता, त्याला पोलिसांनी अटक केलीय.

    • Car Accident: कारने धडक दिल्याने रिक्षातील चौघे तर दुचाकीवर असलेल्या दोघांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर आमदाराचा जावई पळून गेला होता, त्याला पोलिसांनी अटक केलीय.

Sojitra Car Accident: गुजरातच्या आनंद इथं भीषण असा अपघात झाला असून यात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. कारने रिक्षा आणि दुचाकीला जोरदार धडक दिली. कारचालक गुजरातमधील काँग्रेस आमदाराचा जावई असल्याची माहिती समोर आली आहे. आनंदमधील सोजित्राजवळ ही हिट अँड रनची घटना घडली.

ट्रेंडिंग न्यूज

NEET UG Hall Ticket 2024: नीट यूजी परीक्षा प्रवेशपत्र जारी; ‘या’ लिंकवरून करा डाउनलोड, जाणून घ्या परीक्षेची तारीख

Viral VIDEO : बाप की हैवान? मुलाचा घेतला जीव, वजन जास्त असल्यानं जीममध्ये नेऊन ट्रेडमशिनवर पळवलं अन्…

IITमध्ये शिकणाऱ्या ११५ विद्यार्थ्यांनी केली आत्महत्या; २० वर्षातली धक्कादायक आकडेवारी जाहीर

पाकिस्तान आर्मीचे हेलिकॉप्टर वाळवत आहेत गव्हाची शेतं, पंतप्रधान शहबाज यांची उडवली जातेय खिल्ली, VIDEO

याबाबत मिळालेली माहिती अशी की, कारने धडक दिल्यानं रिक्षातील चार जणांचा तर दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला आहे. यात आई आणि दोन मुलींसह एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. दोन्ही बहिणी रक्षाबंधनसाठी आईसोबत मामाकडे गेल्या होत्या. सोजित्रा मतदारसंघातील आमदार पूनम परमार यांचा जावई कार चालवत होता, घटनेनंतर तो फरार झाला होता. पोलिसांनी त्याला याप्रकऱणी अटक केली आहे.

सोजित्रा पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अपघातात कारने इतकी जोरदार धडक दिली की ४ जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोघांनी रुग्णालयात नेण्याआधीच प्राण सोडले. याशिवाय एक जण जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कार अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये चौघे सोजित्रा इथले रहिवाशी आहेत तर दोघे बोरीअवी इथले असल्याची माहिती समोर आली आहे.