मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  गुंतवणुकीची संधी! LIC नंतर आता आणखी एका सरकारी कंपनीचा IPO येणार

गुंतवणुकीची संधी! LIC नंतर आता आणखी एका सरकारी कंपनीचा IPO येणार

Jul 27, 2022, 02:52 PM IST

  • New IPO By Central Government : ECGC ही एक निर्यात क्रेडिट एजन्सी आहे आणि तिला गेल्या वर्षीच IPO द्वारे स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध करण्यासाठी मान्यता देण्यात आली होती. ही एक पूर्णपणे सरकारी मालकीची कंपनी आहे जी निर्यातदारांना विम्यासह अनेक सुविधा पुरवते.

LIC नंतर आता आणखी एक IPO आणणार सरकार (हिंदुस्तान टाइम्स)

New IPO By Central Government : ECGC ही एक निर्यात क्रेडिट एजन्सी आहे आणि तिला गेल्या वर्षीच IPO द्वारे स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध करण्यासाठी मान्यता देण्यात आली होती. ही एक पूर्णपणे सरकारी मालकीची कंपनी आहे जी निर्यातदारांना विम्यासह अनेक सुविधा पुरवते.

  • New IPO By Central Government : ECGC ही एक निर्यात क्रेडिट एजन्सी आहे आणि तिला गेल्या वर्षीच IPO द्वारे स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध करण्यासाठी मान्यता देण्यात आली होती. ही एक पूर्णपणे सरकारी मालकीची कंपनी आहे जी निर्यातदारांना विम्यासह अनेक सुविधा पुरवते.

लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) नंतर आता केंद्र सरकारने एक नवीन इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजेच आयपीओ (IPO) लाँच करण्याची तयारी सुरू केली आहे. सारं काही व्यवस्थित राहिल्यास, चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत ECGC लिमिटेडचा IPO शेअर बाजारात सूचीबद्ध होईल. कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) एम सेंथिलानाथन यांनीही तसे संकेत दिले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Archana express accident : धक्कादायक! धावत्या ट्रेनपासून वेगळे झाले इंजिन, ३ किमी अंतरावर जाऊन थांबले; मोठा अपघात टळला

ऑस्ट्रेलियात नाईट आऊटदरम्यान महिला खासदाराला ड्रग्ज देऊन लैंगिक अत्याचार; व्हिडिओ व्हायरल, पोस्ट करत मांडली व्यथा

Viral News : विमानतळावर प्रवाशाच्या पँटमध्ये सुरू होती चुळबुळ! पोलिसांनी अटक करून तपासले असता निघाले साप

Viral News : लहान मुलाने गिळला एलईडी बल्ब! जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांची पळापळ! वाचा

सेंथिलनाथन यांच्या मते, गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाने (DIPAM) सांगितले होते की, ECGC ची सूची भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) IPO नंतर केली जाईल. "ECGC चा प्राथमिक आढावा दीपम द्वारे करण्यात आला आहे आणि त्यांच्याकडून पुढील दिशा अपेक्षित आहे. सूची चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत होईल,असं सांगण्यात आल्याचं सेंथिलनाथन म्हणाले.

ECGC ही एक निर्यात क्रेडिट एजन्सी आहे आणि गेल्या वर्षीच तिला IPO द्वारे स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध करण्यासाठी मान्यताही देण्यात आली होती. ही एक सरकारी कंपनी आहे जी निर्यातदारांना निर्यातीसाठी क्रेडिट जोखीम विमा आणि संबंधित सेवा प्रदान करते.

गेल्या आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये, ECGC ने ६.१८ लाख कोटी रुपयांच्या निर्यातीला पाठिंबा दिला होता. ३१ मार्चपर्यंत, ६ हजार ७०० हून अधिक विशिष्ट निर्यातदारांनी इतर निर्यातदारांना जारी केलेल्या या थेट कव्हरचा फायदा झाला आहे. एक्सपोर्ट क्रेडिट इन्शुरन्स फॉर बँक्स (ECIB) अंतर्गत ९ हजारांपेक्षा जास्त विशेष निर्यातदारांना फायदा झाला आहे. विशेष म्हणजे यापैकी जवळपास ९६ टक्के छोटे निर्यातदार आहेत.

 

 

 

 

 

विभाग