मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  SBI चे ग्राहक आहात? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची

SBI चे ग्राहक आहात? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची

Jul 27, 2022, 02:02 PM IST

  • SBI Updates : देशातल्या सर्वात मोठ्या सार्वजनिक बँकेने म्हणजेच SBI ने आता रोख रक्कम काढताना OTP सेवा देऊ केली आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी एसबीआयच्या ग्राहकांना एटीएममधून पैसे काढताना त्यांचा नोंदणीकृत मोबाइल सोबत ठेवावा लागेल.

एसबीआयची नवी सुविधा (हिंदुस्तान टाइम्स)

SBI Updates : देशातल्या सर्वात मोठ्या सार्वजनिक बँकेने म्हणजेच SBI ने आता रोख रक्कम काढताना OTP सेवा देऊ केली आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी एसबीआयच्या ग्राहकांना एटीएममधून पैसे काढताना त्यांचा नोंदणीकृत मोबाइल सोबत ठेवावा लागेल.

  • SBI Updates : देशातल्या सर्वात मोठ्या सार्वजनिक बँकेने म्हणजेच SBI ने आता रोख रक्कम काढताना OTP सेवा देऊ केली आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी एसबीआयच्या ग्राहकांना एटीएममधून पैसे काढताना त्यांचा नोंदणीकृत मोबाइल सोबत ठेवावा लागेल.

SBI Customers Update : तुम्ही देखील स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक मोठे अपडेट आहे. आजच्या काळात एटीएम फसवणुकीच्या घटना खूप वाढल्या आहेत. हे रोखण्यासाठी देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक SBI ने OTP रोख काढण्याची सुविधा सुरू केली आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी एसबीआयच्या ग्राहकांना एटीएममधून पैसे काढताना त्यांचा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक सोबत ठेवावा लागेल.

ट्रेंडिंग न्यूज

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

एसबीआयचं OTP आधारित ATM कसे काम करते

एसबीआयचे ग्राहक जेव्हाही एटीएममधून १० हजार रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम काढतात तेव्हा ते OTP सुविधेचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये ग्राहकांना पिन टाकल्यानंतर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला ओटीपी देखील लिहावा लागेल. त्यानंतरच तुमचा व्यवहार पूर्ण समजला जाईल. तुम्हाला सांगतो, ही सुविधा बँक १ जानेवारी २०२२ पासून पुरवत आहे. त्यानंतर बँकेने ट्विटरवर ही माहिती दिली.

संपूर्ण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने समजून घ्या

१. या सुविधेत तुम्हाला OTP लिहावा लागेल.

२. ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर OTP पाठवला जाईल.

३. प्रत्येक व्यवहारावर एक नवीन OTP जनरेट केला जाईल.

४.  ग्राहकाने रक्कम भरल्यानंतर स्क्रीनवर OTP लिहिण्याचा पर्याय दिसेल.

५. यानंतर, व्यवहार पूर्ण करण्यासाठी ग्राहकांना नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर प्राप्त झालेला ओटीपी लिहावा लागेल.

SBI ची WhatsApp बँकिंग सेवा

स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ग्राहकांना व्हॉट्सअॅप बँकिंग (एसबीआय व्हॉट्सअॅप बँकिंग) ची सुविधाही दिली जात आहे. याद्वारे ग्राहकांना व्हॉट्सअॅपवरूनच खात्यातील शिल्लक आणि मिनी स्टेटमेंट पाहता येणार आहे.

यासाठी एसबीआय ग्राहकांना WAREG स्पेस नंतर खाते क्रमांक टाइप करून ७२०८९३३१४८ वर एसएमएस करावा लागेल. यानंतर एसबीआयकडून तुमच्या व्हॉट्सअॅप नंबरवर ९०२२६९०२२६ वरून मेसेज येईल.

पुढील बातम्या