मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Deep Amavasya 2022: गटारी अमावस्या नव्हे दीप अमावस्या म्हणा! कारण…

Deep Amavasya 2022: गटारी अमावस्या नव्हे दीप अमावस्या म्हणा! कारण…

Jul 27, 2022, 01:02 PM IST

  • Importance Of Deep Amavasya: दीप अमावस्येला गटारी अमावस्या म्हणणं काहीसं नीट नसल्याचं घरातली मोठी मंडळी सांगतात. त्याचवेळेस दीप अमावस्या ही दिव्यांची आरास करून साजरी करायची अमावस्या आहे. गटारी नाव कशावरुन पडलं, याकाळात मासाहार का करु नये शाकाहार का करावा याची कारणं वाचा.

दीप अमावस्या

Importance Of Deep Amavasya: दीप अमावस्येला गटारी अमावस्या म्हणणं काहीसं नीट नसल्याचं घरातली मोठी मंडळी सांगतात. त्याचवेळेस दीप अमावस्या ही दिव्यांची आरास करून साजरी करायची अमावस्या आहे. गटारी नाव कशावरुन पडलं, याकाळात मासाहार का करु नये शाकाहार का करावा याची कारणं वाचा.

  • Importance Of Deep Amavasya: दीप अमावस्येला गटारी अमावस्या म्हणणं काहीसं नीट नसल्याचं घरातली मोठी मंडळी सांगतात. त्याचवेळेस दीप अमावस्या ही दिव्यांची आरास करून साजरी करायची अमावस्या आहे. गटारी नाव कशावरुन पडलं, याकाळात मासाहार का करु नये शाकाहार का करावा याची कारणं वाचा.

येत्या २८ जुलै रोजी दीप अमावस्या राज्यात साजरी केली जात आहे. या अमावस्येनंतर एक महिना श्रावण येत असल्याने मांसाहार वर्ज्य करायचा असतो. त्यामुळे या अमावस्येला मांसाहार आणि मद्यपान मोठ्या प्रमाणावर केलं जातं.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

कशी साजरी केली जाते दीप अमावस्या

दीपज्योति: परब्रम्ह दीपज्योतिर्जनार्दन:| दीप हरतुं मे पापं दीपज्योतिर्मनमस्तु ते ||

या अमावस्येला घरातील सर्व दिवे धुऊन स्वच्छ केले जातात. मग त्यांचं पूजन केलं जातं आणि दिवसभर घरात दिवे प्रज्वलित केले जातात.त्यानंतर देवपूजा केली जाते आणि घरातली मुलं ‘शुभंकरोती कल्याणम’चा मंत्र म्हणतात. त्यानंतर घरातल्या मोठ्या व्यक्तींना आणि घरातल्या मुलांना ओवाळलं जातं. संध्याकाळीही घरातली मुलं शुभंकरोती म्हणतात आणि पुन्हा त्यांना ओवाळलं जातं. दीप अमावस्येला घरात गोड पदार्थ सकाळीच बनवला जातो. त्याचा नैवेद्य देवाला दाखवला जातो. घरोघरी आषाढी अमावस्या पूजन केलं जातं.

या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीची पूजाही केली जाते. सकाळी आपल्या पूर्वजांना अर्ध्यही दिलं जातं आणि त्यांचं स्मरण केलं जातं. काही लोक गरजूंना दानही करतात.

श्रावण हा महिना उत्साहाचा तर मानला जातोच मात्र हा महिना हिरवळीचा व बहराचाही असतो. त्यामुळेच शक्य झाल्यास झाडं लावावीत जेणे करून निसर्गाचा समतोल राखला जाऊ शकेल.

दीप अमावस्येला 'गटारी' असं का म्हणतात?

दीप अमावस्येनंतरचा महिना श्रावणाचा असल्याने या महिन्यात मांसाहार करणं टाळलं जातं त्यामुळे आधी मद्यपान केलं जातं आणि आपल्याला आवडणारे मासे किंवा मांस या नंतर ताव मारत खाल्ले जातात. मद्यपान जास्त करण्यावर या दिवशी भर दिला जातो. त्यामुळे काही लोकं लोळत पडलेले पाहायला मिळतात. त्यामुळेच याला 'गटारी' असं नाव पडलं असावं. मात्र, हा सण आहे त्यामुळेच याला गटारी नव्हे तर दीप अमावस्या म्हणावं असं घरातले जेष्ठ सांगतात.

मांसाहार का करू नये?

श्रावण महिन्यात मांसाहार करणं वर्ज्य सांगितलं आहे. या महिन्यात समुद्रातले जीव प्रजोत्पादन करत असतात. त्यामुळे पुढचे ११ महिने मांसाहार करायचा असेल तर श्रावण महिना मांसाहार करू नये असं शास्त्रात सांगितलं आहे. गेल्या काही वर्षापासून या नियमाला हरताळ फासला गेल्याने समुद्री माशांची कमतरता प्रकर्षाने समोर आली आहे. त्याशिवाय ओलसर वातावरणात मांस नीट शिजत नाही, पचत नाही म्हणूनच मांसाहार टाळावा असं सांगितलं गेलं आहे.

मांस नीट शिजवलं न गेल्यास अनेक साथीच्या रोगांचा फैलाव होऊ शकतो.

मांस किंवा मासे यांच्याबाबत योग्य खबरदारी न घेतल्यास ते कुजण्याची प्रक्रिया या महिन्यात जास्त प्रमाणात होते.

फक्त समुद्रीच नव्हे तर अनेक प्राण्यांच्या प्रजननाचा हा काळ असतो. त्यामुळे पुढील काळात मांस खायचं असल्यास या महिन्यात योग्य प्रजनन होऊ द्यावं असं सांगितलं गेलं आहे.

समुद्रालाही या काळात उधाण आलेलं असल्यानं कोळी बांधव या काळात आपली होडी समुद्रात हाकत नाहीत.

शाकाहार करण्यामागची शास्त्रीय कारणे काय?

श्रावण महिन्यात पाऊस असल्याने याच काळात रानभाज्या उगवतात. ज्या पुन्हा वर्षभर पाहायला मिळत नाहीत. या भाज्या आरोग्याला अत्यंत पोषक असतात.

शाकाहाराने भाज्या आपोआप पोटात जातात.

श्रावणातल्या उपवासांमुळे अनेक कंदमुळं पोटात जातात. त्यामुळे अनेक दुर्मिळ खनिजं आपल्या पोटात जातात आणि शरीराला पोषण मिळतं.

कायम मांसाहार करणाऱ्या व्यक्तींच्या पचन संस्थेवर आलेला ताण शाकाहार कमी करतं.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या