मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Kashmir Terror plot: प्रजासत्ताक दिनापूर्वी हल्ल्याचा कट उधळला; काश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांचा खातमा

Kashmir Terror plot: प्रजासत्ताक दिनापूर्वी हल्ल्याचा कट उधळला; काश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांचा खातमा

Dec 29, 2022, 10:37 AM IST

  • Terror Attack : एका ट्रकमध्ये बसून अतिरेकी काश्मिर खोऱ्यात जात होते. त्यावेळी अतिरेकी आणि जवानांमध्ये चकमक झाली असून त्यात चार अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे.

Terror Attack In Jammu And Kashmir (HT)

Terror Attack : एका ट्रकमध्ये बसून अतिरेकी काश्मिर खोऱ्यात जात होते. त्यावेळी अतिरेकी आणि जवानांमध्ये चकमक झाली असून त्यात चार अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे.

  • Terror Attack : एका ट्रकमध्ये बसून अतिरेकी काश्मिर खोऱ्यात जात होते. त्यावेळी अतिरेकी आणि जवानांमध्ये चकमक झाली असून त्यात चार अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे.

Terror Attack In Jammu And Kashmir : पाकिस्तानातून भारतात घुसखोरी करत प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर घातपाताच्या तयारीत असलेल्या चार अतिरेक्यांना सुरक्षा दलांनी ठार केलं आहे. पाकिस्तानातून जम्मूत घुसखोरी केल्यानंतर हे अतिरेकी काश्मिर खोऱ्याच्या दिशेनं निघाले होते. त्यावेळी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीच चार अतिरेक्यांना मारण्यात जवानांना यश आलं असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात संशयास्पद ट्रकचा चालक मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Google Chrome : गुगल क्रोममुळे व्हाल कंगाल! करोडो युजर्सना धोका; सरकारने दिल्या महत्वाचा सूचना, वाचा काय आहे प्रकरण

Viral VIDEO : बाप की हैवान? मुलाचा घेतला जीव, वजन जास्त असल्यानं जीममध्ये नेऊन ट्रेडमशिनवर पळवलं अन्…

IITमध्ये शिकणाऱ्या ११५ विद्यार्थ्यांनी केली आत्महत्या; २० वर्षातली धक्कादायक आकडेवारी जाहीर

पाकिस्तान आर्मीचे हेलिकॉप्टर वाळवत आहेत गव्हाची शेतं, पंतप्रधान शहबाज यांची उडवली जातेय खिल्ली, VIDEO

मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गाजवळील सिध्रा मार्ग परिसरातील तवी पुलाजवळ हातबॉम्ब फेकल्यानं स्फोट झाले. त्यामुळ जवानांनी तातडीनं तवी पुलाच्या दिशेनं धाव घेतली. त्यानंतर झालेल्या सीमा सुरक्षा दलांचे जवान आणि अतिरेक्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार दहशतवादी मारले गेले असून त्यांच्याकडील सात एके रायफल, एक एम ४ रायफल, तीन पिस्तूल जप्त करण्यात आल्याची माहिती जम्मूचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश सिंह यांनी दिली आहे.

दहशतवाद्यांकडून ताब्यात घेतलेल्या सर्व सामग्रीची तपासणी केली जात असून ते पाकिस्तानातून आले की स्थानिक आहेत, याबाबतचीही चौकशी केली जाणार आहे. त्यानंतर आता प्रशासनानं सीमेवर आणि जवानांच्या छावण्यांवरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मारण्यात आलेल्या अतिरेक्यांकडील हत्यारं पाहता हे दहशतवादी संघटनेतील कमांडर असल्याचं समजतं, असंही सिंह यांनी स्पष्ट केलं आहे.