मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nagpur : मुंबई कुणाच्या बापाची नाही, महाराष्ट्राचीच! फडणवीसांनी कर्नाटकच्या मंत्र्याला सुनावलं

Nagpur : मुंबई कुणाच्या बापाची नाही, महाराष्ट्राचीच! फडणवीसांनी कर्नाटकच्या मंत्र्याला सुनावलं

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Dec 28, 2022 01:02 PM IST

Maharashtra Karnataka Border Dispute : मुंबईत २० टक्के कानडी भाषिक लोक राहत असल्याचा दावा करत कर्नाटकच्या मंत्र्यानं मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता त्यांच्या वक्तव्याला फडणवीसांनी थेट उत्तर दिलं आहे.

Devendra Fadnavis Maharashtra Karnataka Border Dispute
Devendra Fadnavis Maharashtra Karnataka Border Dispute (HT)

Devendra Fadnavis Maharashtra Karnataka Border Dispute : शहरात २० टक्के कानडी लोक राहत असल्यानं मुंबईला केंद्राशासित प्रदेश करण्याची वादग्रस्त मागणी कर्नाटकचे मंत्री अश्वत्थ नारायण यांनी केल्यानं नव्या वादाला तोंड फुटलं आहे. त्यानंतर आता शिवसेनेचे नेते संजय राऊतांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अश्वत्थ नारायण यांच्या वक्तव्याचा निषेध करत कर्नाटक सरकारला चांगलंच सुनावलं आहे. त्यामुळं आता सीमावादाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र आणि कर्नाटकातील वाद विकोपाला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अश्वत्थ नारायण यांनी मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबई ही कुणाच्या बापाची नाही तर महाराष्ट्राची आहे. यापुढे कोणत्याही व्यक्तीचे असे वक्तव्य खपवून घेतलं जाणार नाही. आम्ही कर्नाटकच्या मंत्र्यानं केलेल्या विधानाचा निषेध करतो, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कर्नाटक सरकार आणि मंत्री अश्वत्थ नारायण यांना कडक शब्दातं सुनावलं आहे.

मंत्री अश्वत्थ नारायण यांनी मुंबईबाबत केलेल्या वक्तव्याविरोधातली भावना आणि नाराजी आम्ही कर्नाटक सरकारपर्यंत पोहचवणार आहोत. याशिवाय दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर केलेल्या कराराचं उल्लंघन करू नये. कर्नाटकनं कोणत्याही नवीन भूभागावर दावा केल्यास गृहमंत्र्यांसमोर झालेल्या कराराचं उल्लंघन मानलं जाईल, अशा स्पष्ट आणि थेट शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक सरकारविरोधात भूमिका घेतली आहे.

कर्नाटकचे मंत्री अश्वत्थ नारायण हे मूर्ख आहेत- राऊत

मुंबईला केंद्रशासित करण्याची मागणी करणारे कर्नाटकचे मंत्री अश्वत्थ नारायण हे मूर्ख असून आधी सीमाभाग केंद्रशासित होणार असल्याचं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. याशिवाय मुंबईत कानडी लोकांवर अत्याचार केला जात नाही परंतु सीमाभागातील लोकांचं कर्नाटक सरकारनं अनेक प्रकारांनी दमण केल्याचंही संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

IPL_Entry_Point