मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Corruption Cases : उदय सामंतांच्या घोटाळ्यांच्या २५ फायली सापडल्यात; संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

Corruption Cases : उदय सामंतांच्या घोटाळ्यांच्या २५ फायली सापडल्यात; संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Dec 28, 2022 02:21 PM IST

Shiv Sena MP Sanjay Raut : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात थोडी जरी नैतिकता उरली असेल तर त्यांनी घोटाळेबाज मंत्र्यांचा राजीनामा घ्यायला हवा, अशा शब्दांत संजय राऊतांनी शिंदे गटावर टीका केली आहे.

Sanjay Raut On Uday Samant
Sanjay Raut On Uday Samant (HT)

Sanjay Raut On Uday Samant : सरकारमधील शिंदे गटाच्या मंत्र्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मंत्री शंभूराज देसाई, अब्दुल सत्तार, संजय राठोड यांच्यानंतर आता उदय सामंत यांच्यावरही शिवसेनेकडून भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. याबाबत खासदार संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळं आता विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज शिवसेना आणि शिंदे गट एकमेकांसमोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नागपुरात माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, उद्योगमंत्री उदय सामंत यांची एक नाही तर घोटाळ्यांच्या २५ फायली आमच्याकडे पडून आहेत. आज त्या शिवसेनेकडून सभागृहात मांडल्या जाणार होत्या. परंतु सीमावादाचा ठराव आलेला असल्यानं मध्येच इतर विषय न आणण्याच्या सूचना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या असल्यानं शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं उघडकीस आणलेली नाहीत, असं म्हणत संजय राऊतांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

सरकारमधील भाजप नाही तर फक्त शिंदे गटाच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं समोर येत आहेत. हे सगळं गंभीर असून दररोज कोणते ना कोणते बॉम्ब फुटत आहेत. एनआयटी घोटाळा हे टोकन आहे. अजून अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं समोर यायची बाकी आहेत, असं म्हणत संजय राऊतांनी शिंदे गटाला सूचक इशारा दिला आहे.

संजय राठोड, अब्दुल सत्तार, शंभुराजे देसाई आणि आता उदय सामंत यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात थोडीशीही नैतिकता उरली असेल तर त्यांनी या सर्व मंत्र्यांचे राजीनामे घ्यायला हवेत. उदय सामंत यांची डिग्री बोगस असेल तर ते लवकरच डिस्क्वॉलिफाय होतील, असाही दावा राऊतांनी केला आहे.

IPL_Entry_Point