मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  YES Bank-DHFL Fraud: संजय छाब्रिया, अविनाश भोसलेंची ४१५ कोटींची मालमत्ता जप्त

YES Bank-DHFL Fraud: संजय छाब्रिया, अविनाश भोसलेंची ४१५ कोटींची मालमत्ता जप्त

Aug 03, 2022, 02:45 PM IST

    • संजय छाब्रिया आणि अवनाश भोसले यांची मिळून ४१५ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. यात मुंबई, पुण्यासह नागपूरमधील मालमत्तेचा समावेश आहे. 
अविनाश भोसलेंच्या मालमत्तेवर टाच (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

संजय छाब्रिया आणि अवनाश भोसले यांची मिळून ४१५ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. यात मुंबई, पुण्यासह नागपूरमधील मालमत्तेचा समावेश आहे.

    • संजय छाब्रिया आणि अवनाश भोसले यांची मिळून ४१५ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. यात मुंबई, पुण्यासह नागपूरमधील मालमत्तेचा समावेश आहे. 

YES Bank-DHFL Fraud: येस बँक DHFL फसवणूक प्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली असून संजय छाब्रिया यांच्यासह अविनाश भोसले यांची मालमत्ता जप्त केली आहे. संजय छाब्रिया यांची २५१ कोटी रुपयांची तर अविनाश भोसले यांची १६४ कोटी रुपयांची असी मिळून एकत्रित ४१५ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. पीएमएलए कायद्यांतर्गत ही कारवाई ईडीने केली आहे. याआधीच या प्रकरणी रेडियस डेव्हलपर्सचे संजय छाब्रिया आणि पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना ईडीने अटक केली आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

NEET UG Hall Ticket 2024: नीट यूजी परीक्षा प्रवेशपत्र जारी; ‘या’ लिंकवरून करा डाउनलोड, जाणून घ्या परीक्षेची तारीख

Viral VIDEO : बाप की हैवान? मुलाचा घेतला जीव, वजन जास्त असल्यानं जीममध्ये नेऊन ट्रेडमशिनवर पळवलं अन्…

IITमध्ये शिकणाऱ्या ११५ विद्यार्थ्यांनी केली आत्महत्या; २० वर्षातली धक्कादायक आकडेवारी जाहीर

पाकिस्तान आर्मीचे हेलिकॉप्टर वाळवत आहेत गव्हाची शेतं, पंतप्रधान शहबाज यांची उडवली जातेय खिल्ली, VIDEO

ईडीने जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये संजय छाब्रिया यांची मुंबईतील सांताक्रूझ येथील ११६.५ कोटी रुपयांच्या मालमत्तेचा समावेश आहे. तसंच सांताक्रूझमधील ३ कोटी रुपयांचा फ्लॅट, दिल्ली विमानतळावरील हॉटेलमधील १३.६७ कोटी रुपयांचा नफा, तीन लक्झरी कार ज्यांची किंमत जवळपास ३.१० कोटी रुपये इतकी आहे. याशिवाय पुण्यातील व्यावसायिक अविनाश बोसले यांचा मुंबईतील १०२.८ कोटी रुपयांचा डुप्लेक्स फ्लॅट. पुण्यातील १४.६५ आणि २६.२४ कोटी रुपयांची जमीन, नागपूरमधील १५.५२ कोटी आणि १.४५ कोटी रुपयांची जमीन जप्त करण्यात आली आहे. 

ईडीने येस बँकेचे राणा कपूर आणि डीएचएफएलचे कपिल वाधवन आणि धीरज वाधवन यांची चौकशी सुरू केली आहे. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारेच ही चौकशी केली जात आहे. राणा कपूरने डीएचएफएलच्या कपिल वाधवन आणि इतरांसोबत डीएचएफएलला येस बँकेकडू अर्थसहाय्य देण्यासाठी गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

सीबीआयने नुकतंच डीएचएफएल प्रकरणी अविनाश भोसले यांच्यावर कारवाई केली होती. यात अविनाश भोसले यांचे ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर जप्त करण्यात आलं होतं. २०११ मध्ये हे हेलिकॉप्टर ३६ कोटी रुपयांना वर्वा एव्हिएशनने विकत घेतल्याचा आरोप असून या एव्हिएशनचा मालकी हक्क असोसिएसन ऑफ पर्संस यांच्याकडे आहे.