मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  chandrachud news : मला तोंड उघडायला लावू नका; इलेक्टोरल बाँड प्रकरणावरून ज्येष्ठ वकिलावर भर कोर्टात भडकले सरन्यायाधीश

chandrachud news : मला तोंड उघडायला लावू नका; इलेक्टोरल बाँड प्रकरणावरून ज्येष्ठ वकिलावर भर कोर्टात भडकले सरन्यायाधीश

Mar 18, 2024, 05:15 PM IST

  • CJI on Electoral bonds case : इलेक्टोरल बाँड प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी आज एका ज्येष्ठ वकिलाची चांगली खरडपट्टी काढली.

मला तोंड उघडायला लावू नका; ज्येष्ठ वकिलावर भर कोर्टात भडकले सरन्यायाधीश, नेमकं झालं काय? (PTI)

CJI on Electoral bonds case : इलेक्टोरल बाँड प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी आज एका ज्येष्ठ वकिलाची चांगली खरडपट्टी काढली.

  • CJI on Electoral bonds case : इलेक्टोरल बाँड प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी आज एका ज्येष्ठ वकिलाची चांगली खरडपट्टी काढली.

CJI on Electoral bonds case : इलेक्टोरल बाँड्स योजना रद्द करण्याच्या निर्णयाचा फेरविचार केला जावा, अशी विनंती करणाऱ्या ज्येष्ठ वकिलाला सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी आज चांगलंच फटकारलं. ‘मला तोंड उघडायला लावू नका,’ असं चंद्रचूड यांनी संबंधित वकिलाला सुनावलं.

ट्रेंडिंग न्यूज

India Post Office Recruitment: भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये 'या' पदांवर भरती; ८३ हजारापर्यंत पगार मिळणार!

Viral Video: पतीचे दोन्ही हात बांधून दिले सिगारेटचे चटके, नंतर चाकूनं प्रायव्हेट पार्ट कापण्याचा प्रयत्न, पत्नीला अटक

Viral Video : ७५ लाख किंमतीच्या कारमध्ये फिरते वडापाव विकणारी तरुणी; हे कसं घडलं?

Air India Express Flight: एअर इंडिया एक्सप्रेसचे ७८ उड्डाणं अचानक रद्द ! आजारी असल्याचे कारण देत क्रू मेंबर्स गेले रजेवर

मोदी सरकारनं २०१७ साली आणलेली इलेक्टोरल बाँड्सची योजना सर्वोच्च न्यायालयानं घटनाबाह्य ठरवून रद्द केली आहे. त्यावरून सध्या देशभरात गदारोळ सुरू आहे. ही योजना म्हणजे भाजपनं केलेली खंडणीवसुली आहे, असा आरोप विरोधी पक्ष करत आहेत. हा स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा घोटाळा असल्याचंही बोललं जात आहे. याच प्रकरण सर्वोच्च न्यायालयानं स्टेट बँकेचीही दोनदा खरडपट्टी काढली आहे.

आज यावर सुनावणी सुरू असताना ज्येष्ठ वकील आदिश अग्रवाल (Adish Aggarwala) यांनी इलेक्टोरल बाँड्सवरील निर्णयाचा सर्वोच्च न्यायालयानं स्वत:हून पुनर्विचार करावा, अशी मागणी केली. त्यावर सरन्यायाधीशांनी तीव्र प्रतिक्रिया दिली.

‘तुम्ही केवळ सीनियर वकील नाही, तर एससीबीएचे (Supreme Court Bar Association) चे अध्यक्ष आहात हे विसरू नका. माझ्या विशेष अधिकाराचा उल्लेख तुम्ही एका पत्रात केला आहे. हा सगळा प्रसिद्धीचा फंडा आहे. आम्ही त्यात पडणार नाही. मला जास्त बोलण्यास भाग पाडू नका. तुमच्यासाठी ते चांगलं नसेल,’ अशा शब्दांत सरन्यायाधीशांनी अग्रवाल यांची खरडपट्टी काढली.

एससीबीएचीही अग्रवाल यांच्या मागणीपासून फारकत

विशेष म्हणजे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनीही ॲडव्होकेट अग्रवाल यांच्या मताशी असहमती दर्शवली. आम्ही अग्रवाल यांचं समर्थन करत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. अग्रवाल यांनी ही मागणी करण्याची पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी इलेक्टोरल बाँड प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिलं होतं. तेव्हा देखील सुप्रीम कोर्ट बार असोसिएशननं त्यांच्या भूमिकेपासून फारकत घेतली होती. आम्ही अग्रवाल यांना राष्ट्रपतींना पत्र लिहिण्याचा अधिकार किंंवा अनुमती दिलेली नाही, असं एससीबीएनं स्पष्ट केलं.

एसबीआयला २१ मार्चची डेडलाइन

युनिक बाँड नंबरसह इलेक्टोरल बाँड्सशी संबंधित सर्व माहिती २१ मार्चपर्यंत जाहीर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज पुन्हा एकदा स्टेट बँकेला दिले. विशिष्ट बाँड क्रमांक खरेदीदार आणि लाभार्थी राजकीय पक्ष यांच्यातील राजकीय संबंधांवर प्रकाश टाकू शकणार आहे.

इलेक्टोरल बाँड्सच्या प्रकरणावर सुनावणी घेणाऱ्या खंडपीठात न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती बीआर गवई, न्यायमूर्ती जेबी परडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांचा समावेश आहे. स्टेट बँक विशिष्ट दृष्टिकोन किंवा हेतू ठेवून वागू शकत नाही, असं खंडपीठानं स्पष्ट केलं आहे.