मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  शाळकरी मुलांच्या बॅगेत सिगारेट, कंडोम आणि दारुच्या बाटल्या; शिक्षकांसह पालकांनाही आश्चर्याचा धक्का

शाळकरी मुलांच्या बॅगेत सिगारेट, कंडोम आणि दारुच्या बाटल्या; शिक्षकांसह पालकांनाही आश्चर्याचा धक्का

Dec 03, 2022, 02:59 PM IST

    • Bengaluru Crime News Marathi : शाळकरी मुलं वर्गात आक्षेपार्ह वस्तू घेऊन येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिक्षकांनी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या बॅगा चेक केल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या बॅगेतील साहित्य पाहून शिक्षकांना आश्चर्याचा धक्का बसला.
Bags Of School Children In Bengaluru (HT)

Bengaluru Crime News Marathi : शाळकरी मुलं वर्गात आक्षेपार्ह वस्तू घेऊन येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिक्षकांनी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या बॅगा चेक केल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या बॅगेतील साहित्य पाहून शिक्षकांना आश्चर्याचा धक्का बसला.

    • Bengaluru Crime News Marathi : शाळकरी मुलं वर्गात आक्षेपार्ह वस्तू घेऊन येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिक्षकांनी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या बॅगा चेक केल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या बॅगेतील साहित्य पाहून शिक्षकांना आश्चर्याचा धक्का बसला.

Bags Of School Children In Bengaluru : शाळेत शिकण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बॅगेत वही, पेन, पाटी किंवा अन्नपदार्थांचा डबा असणं साहजिक आहे. परंतु कर्नाटकातील एका शाळेत विद्यार्थ्यांच्या बॅगेत चक्क दारुच्या बाटल्या, सिगारेट आणि कंडोम सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळं शाळेतील शिक्षकांसह विद्यार्थ्यांच्या पालकांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यानंतर आता अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी शाळा प्रशासनानं विशेष सूचना जारी केल्या आहेत. याशिवाय पालकांनीही आपल्या पाल्यांच्या सवयीकडे लक्ष देण्याचं आवाहन केलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Google Chrome : गुगल क्रोममुळे व्हाल कंगाल! करोडो युजर्सना धोका; सरकारने दिल्या महत्वाचा सूचना, वाचा काय आहे प्रकरण

Viral VIDEO : बाप की हैवान? मुलाचा घेतला जीव, वजन जास्त असल्यानं जीममध्ये नेऊन ट्रेडमशिनवर पळवलं अन्…

IITमध्ये शिकणाऱ्या ११५ विद्यार्थ्यांनी केली आत्महत्या; २० वर्षातली धक्कादायक आकडेवारी जाहीर

पाकिस्तान आर्मीचे हेलिकॉप्टर वाळवत आहेत गव्हाची शेतं, पंतप्रधान शहबाज यांची उडवली जातेय खिल्ली, VIDEO

मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुरुतील काही शाळांमध्ये विद्यार्थी बॅगमध्ये स्मार्टफोनसह काही आक्षेपार्ह वस्तू नेत असल्याची माहिती शिक्षकांना मिळाली होती. त्यानतंर शिक्षकांनी याबाबत कुणाशीची वाच्यता न करता थेट वर्गात प्रत्येक विद्यार्थ्याची बॅग तपासायला सुरुवात केली. त्यावेळी वर्गातील अनेक विद्यार्थ्यांच्या बॅगेत स्मार्टफोनसह कंडोम, गर्भनिरोधक गोळ्या, लायटर, सिगारेट, दारुच्या बाटल्या आणि व्हाईटनर अशा आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्या. हे सर्व विद्यार्थी आठवी, नववी आणि दहावीच्या वर्गातील आहेत. त्यानंतर धक्कादायक कृताच्या भांडाफोड झाल्यानंतर एका विद्यार्थ्यानं थेट शिक्षकांवरच आरोप केल्याची माहिती आहे.

बंगळुरुतील या धक्कादायक घटनांनंतर आता कर्नाटकातील शाळांच्या असोसिएटेड मॅनेजमेंटनं राज्यातील सर्व शाळांमध्ये दररोज विद्यार्थ्यांच्या बॅगा तपासण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय ज्या विद्यार्थ्यांच्या बॅगेत आक्षेपार्ह वस्तू आढळल्या आहेत, त्यांच्या पालकांना शाळेत बोलावून प्रकरणाची माहिती दिली जात आहे. त्याचबरोबर शाळकरी विद्यार्थ्यांच्या सवयीवर आणि हालचालींवर लक्ष ठेवण्याचीही विनंती शहरातील अनेक शाळांनी पालकांना केली आहे. या घटनेमागे कुणाचा हात आहे किंवा विद्यार्थ्यांनी हे साहित्य त्यांच्या बॅगेत का आणले?, हे अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाही.