मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  BBC Documentary : ट्वीट डिलीट करण्यासाठी वरिष्ठांचा दबाव?, बड्या नेत्याची काँग्रेसला सोडचिठ्ठी

BBC Documentary : ट्वीट डिलीट करण्यासाठी वरिष्ठांचा दबाव?, बड्या नेत्याची काँग्रेसला सोडचिठ्ठी

Jan 25, 2023, 02:51 PM IST

    • Anil Antony Resignation : गुजरात दंगलीवर आधारीत बीबीसीच्या माहितीपटावर केलेलं ट्वीट डिलीट करण्याचा दबाव आणला जात असल्याचा आरोप करत काँग्रेसच्या बड्यानं नेत्यानं राजीनामा दिला आहे.
Anil Antony Resignation (HT)

Anil Antony Resignation : गुजरात दंगलीवर आधारीत बीबीसीच्या माहितीपटावर केलेलं ट्वीट डिलीट करण्याचा दबाव आणला जात असल्याचा आरोप करत काँग्रेसच्या बड्यानं नेत्यानं राजीनामा दिला आहे.

    • Anil Antony Resignation : गुजरात दंगलीवर आधारीत बीबीसीच्या माहितीपटावर केलेलं ट्वीट डिलीट करण्याचा दबाव आणला जात असल्याचा आरोप करत काँग्रेसच्या बड्यानं नेत्यानं राजीनामा दिला आहे.

BBC Documentary On 2002 Gujarat Riots : गुजरात दंगलीवर बीबीसीनं तयार केल्या डॉक्यूमेंट्रीवरून सध्या देशभरात राजकीय वादंग पेटलेलं आहे. बीबीसीच्या माहितीपटाच्या प्रसारणावर केंद्र सरकारनं बंदी घातल्यामुळं विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. परंतु आता बीबीसीच्या डॉक्यूमेंट्रीवर ट्वीट केल्यानंतर पक्षानं ते ट्वीट डिलीट करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप करत माजी मंत्री तथा काँग्रेसचे दिग्गज नेते एके अँटनी यांचे चिंरजीव अनिल अँटनी यांनी काँग्रेसमधील सर्व जबाबदाऱ्यांचा राजीनामा दिला आहे. त्यामुळं काँग्रेसला केरळमध्ये मोठा राजकीय धक्का बसला आहे. याबाबत त्यांनी ट्वीट करत काँग्रेसला सोडचिठ्ठी देत असल्याचं जाहीर केलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Viral Video: पतीचे दोन्ही हात बांधून दिले सिगारेटचे चटके, नंतर चाकूनं प्रायव्हेट पार्ट कापण्याचा प्रयत्न, पत्नीला अटक

Viral Video : ७५ लाख किंमतीच्या कारमध्ये फिरते वडापाव विकणारी तरुणी; हे कसं घडलं?

Air India Express Flight: एअर इंडिया एक्सप्रेसचे ७८ उड्डाणं अचानक रद्द ! आजारी असल्याचे कारण देत क्रू मेंबर्स गेले रजेवर

Hyderabad Rain : तप्त उन्हाळ्यात अचानक बरसला मुसळधार पाऊस, भिंत कोसळून ७ जणांचा मृत्यू

बीबीसीच्या गुजरात दंगलीवरील माहितीपटावर ट्वीट केल्यानंतर माझ्या असहिष्णुपणे पक्षातील काही नेत्यांनी दबाव आणला होता. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारणारे माझ्यावर ट्वीट डिलीट करण्यासाठी दबाव आणत होते. परंतु मी माझी भूमिका न बदलता पक्षाच्या सर्व जबाबदाऱ्यांचा राजीनामा देत असल्याचं अनिल अँटनी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे. याशिवाय काँग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरूर यांनी त्यांच्या भूमिकेचं समर्थन केल्यामुळं अनिल अँटनींनी थरूर यांचंही आभार मानलं आहे. त्यामुळं आता बीबीसीच्या डॉक्यूमेंट्रीवरून वाद सुरू असतानाच आता काँग्रेसला दक्षिण भारतात मोठा राजकीय धक्का बसला आहे.

बीबीसीनं गुजरातमधील दंगलीवर एक माहितीपट प्रदर्शित केला आहे. परंतु माहितीपटातून बीबीसी प्रपोगंडा पसरवत असल्याचा आरोप करत केंद्रातील मोदी सरकारनं त्यावर बंदी घातली आहे. परंतु आता विरोधकांनी या माहितीपटाच्या लिंक्स सोशल मीडियावर शेयर करत लोकांना डॉक्युमेंट्री पाहण्याचं आवाहन केलं आहे.