मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  BBC Documentary : गुजरात दंगलीवरील डॉक्युमेंट्रीचा दुसरा भाग आला; महुआ मोईत्रांनी शेयर केली लिंक

BBC Documentary : गुजरात दंगलीवरील डॉक्युमेंट्रीचा दुसरा भाग आला; महुआ मोईत्रांनी शेयर केली लिंक

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 25, 2023 02:01 PM IST

BBC Documentary On Narendra Modi : बीबीसीनं गुजरात दंगलीवर तयार केलेल्या माहितीपटावर मोदी सरकारनं भारतात बंदी घातली आहे. त्यानंतर आता विरोधकांनी या माहितीपटाच्या लिंक्स सोशल मीडियावर शेयर केल्या आहेत.

BBC Documentary On 2002 Gujarat Riots
BBC Documentary On 2002 Gujarat Riots (HT)

BBC Documentary On 2002 Gujarat Riots : गोध्रा जळीतकांडानंतर गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलीवर आधारीत बीबीसीच्या माहितीपटावर केंद्र सरकारनं आयटी नियमांच्या आधारावर बंदी घातली आहे. त्यामुळं आता जगभरातून मोदी सरकारवर टीका होत असतानाच आता बीबीसीच्या माहितीपटाचा दुसरा भाग रिलीज करण्यात आला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पक्षाच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी डॉक्यूमेंट्रीच्या दुसऱ्या भागाची लिंक शेयर केली आहे. त्यामुळं आता यावरून पेटलेला संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.

गुजरातमध्ये २००२ साली पेटलेल्या दंगलीसाठी तात्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हेच जबाबदार असल्याचं वार्तांकन बीबीसीच्या डॉक्यूमेंट्रीतून करण्यात आलं आहे. याशिवाय या माहितीपटात अनेक लोकांच्या बाईट्स घेण्यात आल्या आहेत. बीबीसीनं माहितीपटातून प्रपोगंडा दाखवल्याचा आरोप करत सरकारनं भारतात त्याच्या प्रसारणावर बंदी घातली आहे. त्यानंतर आता या माहितीपटाचा दुसरा भाग इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. तृणमूलचे खासदार डेरेक ओब्रायन यांच्यानंतर महुआ मोईत्रा यांनीदेखील माहितीपटाच्या लिंक्स सोशल मीडियावर शेयर केल्या आहेत.

बीबीसीच्या पहिल्या भागातील माहितीपटात राजकीय नेते, पत्रकार, दंगलीत प्राण गमावलेल्यांचे नातेवाईक आणि माजी पोलीस अधिकारी संजीव भट यांच्या मुलीची प्रतिक्रिया दाखवण्यात आली आहे. त्यानंतर माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं हा माहितीपट यूट्यूब आणि ट्विटरवर ब्लॉक करण्याचा आदेश जारी केला होता. बीबीसीनं तयार केलेली 'इंडिया- द मोदी क्वेशन' डॉक्यूमेंटरी दोन भागांमध्ये तयार करण्यात आली होती. पहिला भाग प्रदर्शित झाल्यानंतर पेटलेल्या राजकीय वादंगानंतर आता दुसरा भागही प्रदर्शित करण्यात आल्यामुळं सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

IPL_Entry_Point