मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Bypoll : अचानक असं काय झालं?; चिंचवड, कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाने बदलल्या
Pune Bypoll
Pune Bypoll

Pune Bypoll : अचानक असं काय झालं?; चिंचवड, कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाने बदलल्या

25 January 2023, 12:39 ISTNinad Vijayrao Deshmukh

Chinchwad Kasba Peth Bypoll : पुण्यातील कसबा आणि पिंपरी-चिंचवड येथील पोटनिवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाने बदलल्या आहेत. निवडणूक आयोगाने नव्या तारखा जाहीर केल्या आहेत.

पुणे : पुण्यातील कसबा आणि पिंपरी-चिंचवड येथील पोट निवडणुकीवरून राजकारण तापले आहे. महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात या बद्दल चुरस पाहायला मिळत असून या दोन्ही जागांसाठी उमेवार उभे करण्याच्या चाचपणी करत असतांना निवडणूक आयोगाने या पोट निवडणुकांच्या तारखा बदलल्या आहेत. २७ फेब्रुवारीऐवजी २६ फेब्रुवारीला पोटनिवडणूकसाठी मतदान होणार आहे. बारावीच्या परीक्षा असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आमदार मुक्ता टिळक आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे कसबा आणि पिंपरी-चिंचवड मतदार संघाच्या जागा रिक्त झाल्या होत्या. दरम्यान, निवडणूक आयोगाने केलेल्या घोषणेनुसार २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार होते. तर २ मार्च रोजी मतमोजणीची तारीखही निश्चित करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर महाराष्ट्रातील १२वीच्या परीक्षा आणि मतदानाच्या तारखा एकाच काळात येत असल्याने या २७ एवजी २६ तारखेला आता मतदान होणार आहे.

या संदर्भात निवडणूक आयोगाने परिपत्रक काढले असून यात १२ वीच्या परीक्षांचे कारण देत तारखांमद्धे बदल करण्यात येत असल्याचे जाहीर केलए आहे. महाराष्ट्रातील चिंचवड विधानसभा मतदारसंघ आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकांसाटी ३१ जानेवारी रोजी अधिसूचना काढण्यात येणार आहे. त्यानंतर अर्ज दाखल करता येणार असून त्याची अंतिम मुदत ही ७ फेब्रुवारी राहणार आहे. तर ८ फेब्रुवारी रोजी अर्जांची छाननी होऊन. १० फेब्रुवारी ही अर्ज मागे घेता येणार आहे. त्यानंतर २६ फेब्रुवारी रोजी या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.

विभाग