मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Gujarat Roits : गुजरात दंगलीतील २२ आरोपींची निर्दोष सुटका; पुरावे न मिळाल्यानं कोर्टाचा निकाल
gujarat riots case in supreme court
gujarat riots case in supreme court (HT)

Gujarat Roits : गुजरात दंगलीतील २२ आरोपींची निर्दोष सुटका; पुरावे न मिळाल्यानं कोर्टाचा निकाल

25 January 2023, 14:19 ISTAtik Sikandar Shaikh

Gujarat Roits Case : काही दिवसांपूर्वीच बिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील सर्व आरोपींची कोर्टानं सुटका केली होती. त्यानंतर आता गुजरात दंगलीतील आरोपींची पुराव्यांअभावी कोर्टानं निर्दोष सुटका केली आहे.

gujarat riots case in supreme court : गोध्रा जळीतकांडानंतर संपूर्ण गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलीत १७ जणांची हत्या केल्याचा आरोप असलेल्या २२ आरोपींची कोर्टानं पुराव्यांअभावी सुटका केल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच बिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील आरोपींची सुटका करण्यात आली होती. त्यानंतर आता गुजरात दंगलीतील आरोपींची सुटका करण्यात आल्यामुळं यावरून राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे. कोर्टानं ज्या २२ आरोपींची निर्दोष सुटका केली आहे, त्यातील आठ आरोपींचा मृत्यू झालेला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

गुजरातमध्ये २००२ साली उसळलेल्या दंगलीत पंचमहल जिल्ह्यातील देलोल या गावात जमावाकडून दोन चिमुकल्यांसह १६ जणांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील २२ आरोपींविरोधात गेल्या १८ वर्षांपासून खटला सुरू होती. त्यानंतर आता गुजरातमधील कोर्टानं २२ आरोपींची पुराव्यांअभावी निर्दोष सुटका केली आहे. यापूर्वीदेखील अहमदाबादेतील दंगलीतील आरोपींची सुटका करण्यात आली होती. त्यानंतर आता २२ आरोपींची सुटका करण्यात आल्यामुळं यावरून राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.

गोध्रा जळीतकांडानंतर गुजरातमधील अनेक भागांमध्ये दंगल उसळली होती. त्यात हजारो लोकांची हत्या करण्यात आली होती. याशिवाय गुजरात दंगलीत तात्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवरही अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. गुजरात दंगलीवर बीबीसीनं नुकतीच एक डॉक्यूमेंट्री प्रदर्शित केली आहे. ज्यात दंगलीसाठी थेट नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरण्यात आलं आहे. त्यामुळं केंद्र सरकारनं या माहितीपटाच्या भारतातील प्रसारणाला बंदी घातली आहे.