मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Shraddha Murder Case : श्रद्धाचा मारेकरी तुरुंगात खेळतोय बुद्धीबळ; आफताबचं वर्तन पाहून अधिकारी भडकले

Shraddha Murder Case : श्रद्धाचा मारेकरी तुरुंगात खेळतोय बुद्धीबळ; आफताबचं वर्तन पाहून अधिकारी भडकले

Dec 03, 2022, 08:32 AM IST

    • Shraddha Walker Murder Case : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात दिवसेंदिवस नवनवे धक्कादायक खुलासे होत आहे. दिल्ली पोलिसांनी आरोपी आफताबची पॉलिग्राफ आणि नार्को टेस्ट केली आहे.
Shraddha Walker Murder Case (HT)

Shraddha Walker Murder Case : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात दिवसेंदिवस नवनवे धक्कादायक खुलासे होत आहे. दिल्ली पोलिसांनी आरोपी आफताबची पॉलिग्राफ आणि नार्को टेस्ट केली आहे.

    • Shraddha Walker Murder Case : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात दिवसेंदिवस नवनवे धक्कादायक खुलासे होत आहे. दिल्ली पोलिसांनी आरोपी आफताबची पॉलिग्राफ आणि नार्को टेस्ट केली आहे.

Shraddha Walker Murder Case : संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात आता पोलीस तपासात दररोज नवनवे आणि धक्कादायक खुलासे होत आहे. आरोपी आफताबनं श्रद्धाची कवटी फोडण्यासाठी हातोड्याचा आणि मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी करवतीचा वापर केल्याचा खुलासा पोलीस तपासात झालेला आहे. याशिवाय आफताबच्या खोलीतून आणि दिल्लीलगतच्या जंगलातून श्रद्धा वालकरच्या मृतदेहाचे अवशेष जप्त करण्यात आले आहेत. परंतु या प्रकरणाचा तपास सुरू असताना आफताब निवांत आणि चालाखीनं जबाब देत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं आहे. त्यातच आता तो दिल्लीतील तिहाड जेलमध्ये बुद्धीबळ खेळत असल्याचीही माहिती समोर आली आहे. श्रद्धाची हत्या करूनही कोणताही पश्चाताप नसल्याचं वक्तव्य आरोपी आफताबनं यापूर्वी केलं होतं.

ट्रेंडिंग न्यूज

10th Passed Job: दहावी उतीर्ण उमेदवारांसाठी रेल्वेत नोकरी, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया आणि शेवटची तारीख!

DK Shivkumar Viral Video: खांद्यावर हात ठेवल्याने डीके शिवकुमार संतापले, सगळ्यांसमोर कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली!

Farooq Abdullah : ''पाकिस्तानने बांगड्या भरल्या नाहीत, त्यांच्याकडेही अणुबॉम्ब''; फारुख अब्दुल्ला यांचे वादग्रस्त विधान

al jazeera ban in israel:इस्रायलमध्ये अल जझीरा वृत्तवाहिनीवर बंदी, हमास युद्धादरम्यान पंतप्रधान नेतन्याहूंची मोठी कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताबच्या पाच पॉलिग्राफी टेस्ट करण्यात आल्या असून नार्को टेस्टही पूर्ण झाली आहे. त्यात त्यानं श्रद्धाची हत्या एकट्यानंच केली असून अन्य कुणाचा यात सहभाग नसल्याचं सांगितलं. त्यानंतर त्याला तुरुंगात पाठवण्यात आलं. परंतु फॉरेन्सिक अधिकाऱ्यांचं विशेष पथक त्याचा जबाब नोंदवण्यासाठी जेव्हा दिल्लीतील तिहाड जेलमध्ये पोहचलं तर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण आरोपी आफताब जेलमधील इतर कैद्यांसोबत बुद्धीबळ खेळत होता. त्यामुळं फॉरेन्सिक विभागाचे अधिकारी सुरक्षा रक्षकांवर चांगलेच भडकले होते. त्यानंतर त्याचा जबाब नोंदवण्यात आला आहे.

आरोपी आफताब पुनावालानं श्रद्धा वालकरच्या मृतदेहांचे तुकडे करण्यासाठी खास चीनी चाकुचा वापर केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतही पोलिसांनी तपास सुरु केला आहे. याशिवाय श्रद्धाचा मृतदेह आफताबच्या खोलीत असताना त्याला भेटण्यासाठी एक तरुणी त्याच्या खोलीत आली होती. त्यानंतर आता पोलिसांनी या तरुणीचीही चौकशी केल्याचं समजतं.