मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Shraddha Walker : फ्रिजमध्ये श्रद्धाचा मृतदेह अन् आफताब दुसऱ्या मुलीसोबत; तपासात धक्कादायक खुलासा

Shraddha Walker : फ्रिजमध्ये श्रद्धाचा मृतदेह अन् आफताब दुसऱ्या मुलीसोबत; तपासात धक्कादायक खुलासा

Nov 27, 2022, 10:43 AM IST

    • Shraddha Murder Case : दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात आता दररोज नवनवे खळबळजनक खुलासे होत आहेत. श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये ठेऊन आरोपी आफताबनं धक्कादायक गोष्टी केल्याचा खुलासा झाला आहे.
Shraddha Walker Murder Case Update (HT)

Shraddha Murder Case : दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात आता दररोज नवनवे खळबळजनक खुलासे होत आहेत. श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये ठेऊन आरोपी आफताबनं धक्कादायक गोष्टी केल्याचा खुलासा झाला आहे.

    • Shraddha Murder Case : दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात आता दररोज नवनवे खळबळजनक खुलासे होत आहेत. श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये ठेऊन आरोपी आफताबनं धक्कादायक गोष्टी केल्याचा खुलासा झाला आहे.

Shraddha Walker Murder Case Update : संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात आता दिवसेंदिवस नवनवे धक्कादायक खुलासे होत आहेत. आरोपी आफताबला अटक केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्याला घटनास्थळासह ज्या ठिकाणी श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फेकले आहेत, तिथं नेऊन तपास केला. त्यानंतर आता पोलीस तपासात आणखी एक मोठा आणि तितकाच धक्कादायक खुलासा झाला आहे. श्रद्धा वालकरची हत्या केल्यानंतर आफताबनं दुसऱ्या एका तरुणीला घरात बोलावलं असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळं आता पोलिसांनी ती तरुणी कोण होती, याचा शोध घेतला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Cyber Crime : मोठ्या फ्रॉडचा धोका, गुगलने घातली 'या' ॲप्सवर बंदी! गुरुग्राम पोलिसांनी पाठवली होती नोटीस

झारखंडमध्ये सूर्य देवाचा प्रकोप! तापमान पोहोचले ४७ अंश सेल्सिअसवर, २ बेशुद्ध, एकाचा मृत्यू, हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू १ मे रोजी अयोध्या दौऱ्यावर; रामलल्ला दर्शन, शरयू पूजन, असा आहे संपूर्ण कार्यक्रम!

Naxalite Encounter : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश, तीन महिलांसह १० नक्षलवाद्यांचा खात्मा

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आफताबनं श्रद्धाच्या हत्या केल्यानंतर त्याच्या मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर पेशानं साइकॉलजिस्ट असलेल्या एका तरुणीला रुममध्ये बोलावलं होतं. त्यानंतर त्यांनी अनेक तास सोबत घालवल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळं आता पोलिसांनी दिल्लीतील या साइकॉलजिस्ट तरुणीला फोन करून तिला पोलीस ठाण्यात बोलावून तिची चौकशी केल्याची माहिती आहे. त्यामुळं आता श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात या तरुणीचा काय रोल आहे?, किंवा तिनं आरोपी आफताबला काही मदत केली आहे का, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

दरम्यान आता पोलिासांनी आरोपी आफताबला अटक केल्यानंतर न्यायालयानं त्याला काही दिवस पोलीस कोठडीत ठेवलं होतं. त्यानंतर आता कोर्टानं आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय आता उद्या आरोपी आफताब पुनावालाची नार्को टेस्ट होणार असल्यानं त्यातून अनेक गोष्टींचं सत्य बाहेर येण्याची शक्यता आहे. श्रद्धाच्या मृतदेहाचा डीएनए रिपोर्ट अद्याप समोर आलेला नसल्यानं पोलिसांनी आफताबची पॉलिग्राफ टेस्ट करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्याची तब्येत ठीक नसल्यामुळं पोलिसांनी पॉलिग्राफ टेस्ट घेतली नाही.