मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  BirthDay Party : ठाण्यात चक्क स्मशानभूमीत बड्डे पार्टी; बिर्याणी खाण्यासाठी शेकडो लोकांची हजेरी

BirthDay Party : ठाण्यात चक्क स्मशानभूमीत बड्डे पार्टी; बिर्याणी खाण्यासाठी शेकडो लोकांची हजेरी

Nov 24, 2022, 10:58 AM IST

    • BirthDay Party In Cemetery : एका तरुणानं ठाण्यातील स्माशानभूमीत वाढदिवसाची पार्टीसाठी शेकडो लोकांना बिर्याणी खाऊ घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
BirthDay Party In Thane Cemetery (HT)

BirthDay Party In Cemetery : एका तरुणानं ठाण्यातील स्माशानभूमीत वाढदिवसाची पार्टीसाठी शेकडो लोकांना बिर्याणी खाऊ घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

    • BirthDay Party In Cemetery : एका तरुणानं ठाण्यातील स्माशानभूमीत वाढदिवसाची पार्टीसाठी शेकडो लोकांना बिर्याणी खाऊ घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

BirthDay Party In Thane Cemetery : अनेक लोकांना त्यांचा वाढदिवस नातेवाईक किंवा मित्रांसोबत हॉटेलमध्ये अथवा पर्यटनस्थळावर साजरा करायला आवडतो. याशिवाय काही लोक वाढदिवस साजरा केल्यानंतर मांसाहाराचा बेत आखत असतात. परंतु ठाण्यात एका तरुणानं वाढदिवसाचा केक चक्क स्मशानभूमीत कापला आहे. इतकंच नाही तर त्यानं शंभर लोकांना वाढदिवसानिमित्त बिर्याणी खाऊ घातली आहे. या धक्कादायक प्रकारामुळं अनेक लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pyarali Nayani : चित्रा वाघ अडचणीत येणार; अभिनेते प्याराली नयानी यांचा खटला दाखल करण्याचा इशारा

Pune Traffic Update : पुणेकरांनो घराबाहेर पडण्याआधी हि बातमी वाचा! मेट्रोच्या कामासाठी शिमला ऑफिस चौकात वाहतुकीत बदल

Pune Police : पुण्यात पुन्हा एकदा गुन्हेगारांची धिंड! हजारहून अधिक अट्टल गुन्हेगारांना पोलिस ठाण्यात उभे करत दिली तंबी

Maharashtra Weather Update: राज्यात ऊन पावसाचा खेळ! मुंबई, रायगड, ठाणे, सांगली, सोलापूरला उष्णतेची लाट तर विदर्भात पाऊस

मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील गौतम रतन मोरे या युवकानं अंधश्रद्धेविरोधात समाजात संदेश देण्यासाठी स्मशानभूमीत वाढदिवस साजरा केला आहे. इतकंच नाही तर त्यानं वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या मित्रांना आणि नातेवाईकांना स्मशानातच बिर्याणी खाऊ घातली. या कार्यक्रमात ४० महिला आणि मुलांसह तब्बल १०० लोक सहभागी झाले होते. त्याचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

स्मशानभूमीत वाढदिवस साजरा केल्यानंतर गौतम मोरे माध्यमांशी बोलताना म्हणाला की, स्मशानात भूत असतात, अशी श्रद्धा आपल्या समाजात आहे. परंतु ही धारणा चुकीची आहे. सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ आणि नरेंद्र दाभोळकर यांच्यापासून मला अंधश्रद्धेविरोधात लढण्याची प्रेरणा मिळाली असून आम्ही जादू, कर्मकांड आणि अंधश्रद्धेविरोधात सातत्यानं मोहीम राबवून लोकांमध्ये जनजागृती करण्याचं काम करत आहोत. त्यामुळंच आता आम्ही थेट स्मशानात वाढदिवसाची पार्टी साजरी केल्याचं गौतम म्हणाला.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा