मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Priyanka Gandhi In BJY : प्रियांका गांधी पती आणि मुलांसह भारत जोडो यात्रेत सहभागी

Priyanka Gandhi In BJY : प्रियांका गांधी पती आणि मुलांसह भारत जोडो यात्रेत सहभागी

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Nov 24, 2022 10:23 AM IST

Bharat Jodo Yatra : कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रानंतर आता मध्यप्रदेशात दाखल झाली आहे. यावेळी कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी आणि त्यांचे पती रॉबर्ड वाड्रा पदयात्रेत दाखल झाले.

Bharat Jodo Yatra In Madhya Pradesh
Bharat Jodo Yatra In Madhya Pradesh (HT)

Bharat Jodo Yatra In Madhya Pradesh : तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्रानंतर आता कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा मध्यप्रदेशात दाखल झाली आहे. गेली दोन दिवस पदयात्रेनं विश्रांती घेतली होती. यावेळी राहुल गांधी हे गुजरात विधानसभेच्या प्रचारात दाखल झाले होते. त्यानंतर ते गुजराहून औरंगाबाद विमानतळावरून मध्यप्रदेशात दाखल झाले आहेत. त्यानंतर आता ते पुन्हा मध्यप्रदेशातील भारत जोडो यात्रेत सहभागी झाले. त्यानंतर आता कॉंग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी या त्यांचे पती रॉबर्ड वाड्रा यांच्यासह भारत जोडो यात्रेत दाखल झाल्या आहेत. त्यामुळं आता कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.

मध्यप्रदेशात कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा दाखल झाल्यानंतर बुऱ्हानपूरमधून प्रियांका गांधी सहभागी झाल्या आहेत. यावेळी त्यांचे पती राबर्ट वाड्रा यांच्यासह त्यांचे मुलंदेखील पदयात्रेत सहभागी झाले आहेत. त्यामुळं आता भारत जोडो यात्रा उत्तर भारतात दाखल झाल्यानंतर संपूर्ण गांधी कुटुंब भाजपविरोधात रान पेटवण्यासाठी पदयात्रेत दाखल झाल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी जेव्हा भारत जोडो यात्रा कर्नाटकातून प्रवास करत होती, त्यावेळी कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी पदयात्रेत सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी चालताना आई सोनिया गांधी यांच्या बुटाची लेस राहुल गांधी यांनी स्वत:च्या हातानं दुरुस्त केली होती. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

मध्यप्रदेशात भारत जोडो यात्रेला मोठा प्रतिसाद...

कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा जेव्हा मध्यप्रदेशात दाखल झाली तेव्हा राहुल गांधींना पाठिंबा देण्यासाठी तरुण आणि महिलांनी मोठी गर्दी केली होती. याशिवाय माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि दिग्विजय सिंह हे देखील यात्रेत सहभागी झाले. २०१७ साली मध्यप्रदेशातील विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसनं विजय मिळवला होता. परंतु ज्योतिरादित्य शिंदे यांनी २२ आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश केल्यानं कॉंग्रेसची राज्यातील सत्ता गेली होती. त्यानंतर आता राहुल गांधी हे आगामी मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी कशी रणनीती आखणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

IPL_Entry_Point