मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Leopard Attack : जेवण करणाऱ्या महिलेवर बिबट्याचा हल्ला; फरफटत नेऊन लचके तोडले

Leopard Attack : जेवण करणाऱ्या महिलेवर बिबट्याचा हल्ला; फरफटत नेऊन लचके तोडले

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Nov 24, 2022 09:07 AM IST

Leopard Attack Nandurbar : महिला घराच्या अंगणात जेवण करत होती. त्यावेळी अचानक बिबट्यानं तिच्यावर हल्ला केला.

Leopard Attack On Women
Leopard Attack On Women (HT)

Leopard Attack On Women : घराच्या अंगणात जेवण करत असलेल्या एका महिलेवर बिबट्यानं हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला असून बिबट्यानं महिलेला जंगलात फरफटत नेत मृतदेहाचे लचके तोडले आहेत. या धक्कादायक घटनेनं नंदूरबार जिल्ह्यात खळबळ उडाली असून मानवी वस्तीत घुसून हल्ला करणाऱ्या बिबट्याला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली जात आहे. याशिवाय बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून जिल्हाभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नंदूरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातल्या डाबचा मालीआंबा या गावात मोगराबाई रुमा तडवी या घराच्या अंगणात जेवण करत होत्या. त्यावेळी अचानक एका बिबट्यानं त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यावेळी घरात कुणीच नसल्यानं बिबट्यानं मोगराबाई यांचा मृतदेह जंगलात नेला.

जेव्हा मोगराबाई घरी न दिसल्यामुळं त्यांच्या नातेवाईकांनी शोध सुरू केला. तेव्हा त्यांच्या नातेवाईकांना बिबट्या मृतदेहाचे लचके तोडत असल्याचं दिसून आलं. त्यानंतर आता या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि अक्कलकुवा पोलीस घटनास्थळी दाखळ झाले. घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. त्यानंतर आता परिसरातील हिंस्त्र प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

WhatsApp channel