मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune murder : खळबळजनक ! पुण्यात चारित्र्याच्या संशयावरून इंजिनीअर असलेल्या पतीकडून पत्नीचा खून

Pune murder : खळबळजनक ! पुण्यात चारित्र्याच्या संशयावरून इंजिनीअर असलेल्या पतीकडून पत्नीचा खून

Dec 05, 2022, 01:56 PM IST

    • Pune Crime : पुण्यात चारित्र्याच्या संशयावरून एका इंजिनीअर असलेल्या तरुणाने चाकूने भोसकून आपल्या पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे.
पुणे क्राइम (HT_PRINT)

Pune Crime : पुण्यात चारित्र्याच्या संशयावरून एका इंजिनीअर असलेल्या तरुणाने चाकूने भोसकून आपल्या पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे.

    • Pune Crime : पुण्यात चारित्र्याच्या संशयावरून एका इंजिनीअर असलेल्या तरुणाने चाकूने भोसकून आपल्या पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे.

पुणे : पुण्यात चारित्र्याच्या संशयावरून इंजिनिअर असलेल्या तरुणाने आपल्या पत्नीच्या चाकूने भोसकून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना हडपसर येथील भेकराईनगर येथे आज सकाळी घडली. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune vishrantwadi murder : भांडणे सोडवायला गेला अन् जीव गमावून बसला! पुण्यातील विश्रांतवाडी येथील घटना

Maharashtra Weather Update: विदर्भ, मराठवाड्यात पुढील ३ दिवस पावसाचे! ठाणे रायगडमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा

परभणीत ऑनर किलिंग..! प्रेम विवाहाला विरोध करत आई-बापाने पोटच्या मुलीचा केला ‘सैराट’ अंत

Salman Khan Firing Case : गोळीबार प्रकरणाला वेगळं वळण! आरोपीचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर, सलमान खान अडचणीत!

राजेंद्र भाऊराव गायकवाड (वय ३१) असे आरोपी पतीचे नाव आहे. तर ज्योती राजेंद्र गायकवाड (वय २८) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजेंद्र गायकवाड आणि ज्योती गायकवाड यांचे काही दिवसांपूर्वी लग्न झाले होते. ते भेकराई नगर मधील गुरुदत्त कॉलनी भक्तनिवास या ठिकाणी राहत होते. राजेंद्र गायकवाड हा इंजिनियर आहे.

काही दिवसांपासून राजेंद्र गायकवाड हा पत्नी ज्योतीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यारून दोघांमध्ये वारंवार खटके उडायचे. आज देखील ज्योतीच्या चारित्र्यावरून त्याने राजेंद्र याने संशय घेत भांडण उकरून काढले. हे भांडण टोकाला गेले. पत्नीचा राग आल्याने राजेंद्र याने स्वयंपाक घरातील चकुच्या साह्याने ज्योतीला भोसकले. यात गंभीर जखमी झाल्याने ज्योती गायकवाड यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, घरा शेजारील नगरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली,. पोलिसांनी आरोपी राजेंद्र गायकवाड याला अटक केली आहे. पोलिसांनी ज्योतीचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे. पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा