मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी वंचितच्या ११ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, 'या' नेत्यांना संधी!

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी वंचितच्या ११ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, 'या' नेत्यांना संधी!

Mar 31, 2024, 10:43 PM IST

    • Vanchit Bahujan Aghadi 2nd Candidates List 2024 Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या दुसऱ्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी वंचितने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे.

Vanchit Bahujan Aghadi 2nd Candidates List 2024 Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या दुसऱ्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

    • Vanchit Bahujan Aghadi 2nd Candidates List 2024 Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या दुसऱ्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

Vanchit Bahujan Aghadi News: लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत ११ लोकसभा मतदार संघातील उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. वंचितने दुसऱ्या यादीत हिंगोली, लातूर, सोलापूर, माढा, सातारा, धुळे, हातकणंगले, रावेर, जालना, मुंबई उत्तर मध्य, रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai airport: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्ट्या आज ६ तास बंद राहणार, जाणून घ्या कारण

Weather Updates: विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात आज अवकाळी पावसाची शक्यता, मुंबई आणि कोकणात उष्णता कायम

Nagpur: ब्रेकअप झाल्यानं प्रियकर संतापला, प्रेयसी काम करत असलेले दुकानच पेटवून दिलं; नागपूर येथील घटना

Maharashtra Legislative Council Elections: विधान परिषदेच्या शिक्षक, पदवीधर निवडणुकीसाठी १० जूनला मतदान; 'या' दिवशी निकाल

वंचितच्या वतीने लोकसभा निवडणुकीसाठी दुसरी यादी जाहीर करण्यात आली. हिंगोलीतून डॉ.बी.डी चव्हाण या, लातूरमधून नरसिंहराव उदगीरकर आणि सोलापूरमधून राहुल काशिनाथ गायकवाड यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. याशिवाय, माढा- रमेश बारसकर, सातारा- मारूती जानकर, धुळे- अब्दुल रहेमान, हातकणंगले- दादासाहेब उर्फ दादगौडा चवगोंडा पाटील, रावेर- संजय ब्राम्हणे, जालना- प्रभाकर देवमन बकले, मुंबई उत्तर मध्य- अबुल हसन खान आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग येथे काका जोशी यांना उमेदवारी घोषित करण्यात आली.

यापूर्वी वंचितने त्यांच्या ८ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यात भंडारा- गोंदिया, गडचिरोली- चिमूर, चंद्रपूर, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ- वाशिम मतदारसंघातील उमेदवारांचा समावेश होता.

देशात येत्या १९ एप्रिलपासून आगामी लोकसभा निवडणुकीला सुरुवात होत आहे. यंदा लोकसभा निवडणूक सात टप्प्यांत होणार आहे. तर, ४ जून २०२४ रोजी निकाल जाहीर होईल, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली. याशिवाय, महाराष्ट्रात पहिल्यांदाच पाच टप्यांत लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. हाराष्ट्रात पहिला टप्पा १९ एप्रिल, दुसरा टप्पा २६ एप्रिल, तिसरा टप्पा ७ मे, चौथा टप्पा १३ मे आणि पाचवा आणि शेवटचा टप्पा २० मे रोजी पार पडणार आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा