मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Lok Sabha Election 2024: बारामतीतून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी; सुप्रिया सुळेंविरुद्ध लढणार!

Lok Sabha Election 2024: बारामतीतून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी; सुप्रिया सुळेंविरुद्ध लढणार!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 30, 2024 07:37 PM IST

Sunetra Pawar vs Supriya Sule: आगामी लोकसभा निवडणुकीत अजित पवार पक्षाकडून बारामती मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार पक्षाची पहिली यादी जाहीर होताच अजित पवार पक्षाने बारामती मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी घोषित केली.
लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार पक्षाची पहिली यादी जाहीर होताच अजित पवार पक्षाने बारामती मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी घोषित केली.

Lok Sabha Election Baramati Constituency: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार पक्षाने नुकतीच त्यांच्या पाच उमेदवारांची नावे जाहीर केली. त्यानंतर काही वेळातच अजित पवार पक्षाने बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा केली. यामुळे बारामतीत नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार लढत पाहायला मिळेल, अशा चर्चा सुरू होत्या. त्या चर्चा आता खऱ्या ठरल्या आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

नुकतीच शरद पवार पक्षाने त्यांच्या पाच उमेदवार जाहीर केली. बारामतीमधून सुप्रिया सुळे, शिरुरमधून विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे, अहमदनगरमधून नीलेश लंके, वर्ध्यामधून अमर काळे आणि दिंडोरीमधून भास्करराव बगरे हे शरद पवारांसाठी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. यानंतर अजित पवार पक्षाने बारामतीमधून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी घोषित करत लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुकले.

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवारांच्या पक्षातील पाच उमेदवारांची नावे जाहीर!

 

सुनेत्रा पवार कोण आहेत?

सुनेत्रा पवार या अजित पवार यांच्या पत्नी असून माजी मंत्री पदमसिंह पाटील यांच्या बहिण आहेत. सुनेत्रा पवार या पहिल्यांदाच निवडणूक लढवणार असल्या तरी समाजसेवेच्या कार्यात त्यांचे योगदान आहे. दरम्यान, २०१० मध्ये स्थापन झालेल्या एनजीओ एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या त्या संस्थापक आहेत.

बारामती मतदारसंघ शरद पवारांचा बाल्लेकिल्ला

बारामती मतदारसंघ हा शरद पवारांचा बाल्लेकिल्ला आहे. शरद पवारांनी १९८४, १९९६, १९९९, २००४ मध्ये बारामतीतून लोकसभा निवडणूक जिंकली. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये बारामतीमतदार संघातून लोकसभा निवडणूक जिंकली. तर, अजित पवार यांनी १९९१समध्ये बारामतीतून लोकसभा निवडणूक जिंकली.

IPL_Entry_Point