मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Grant Road : मुंबईत थरार! कौटुंबिक वादातून शेजाऱ्यांवर चाकूहल्ला; दोघांचा जागीच मृत्यू

Grant Road : मुंबईत थरार! कौटुंबिक वादातून शेजाऱ्यांवर चाकूहल्ला; दोघांचा जागीच मृत्यू

Mar 24, 2023, 08:29 PM IST

  • Grant Road Mumbai News : ग्रँड रोड भागातील एका चाळीत ही संतापजनक घटना घडली आहे. कौटुबिक वादातून आरोपीनं चाकूहल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे.

Grant Road Mumbai Crime News (HT)

Grant Road Mumbai News : ग्रँड रोड भागातील एका चाळीत ही संतापजनक घटना घडली आहे. कौटुबिक वादातून आरोपीनं चाकूहल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे.

  • Grant Road Mumbai News : ग्रँड रोड भागातील एका चाळीत ही संतापजनक घटना घडली आहे. कौटुबिक वादातून आरोपीनं चाकूहल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे.

Grant Road Mumbai Crime News : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतून अत्यंत धक्कादायक आणि संताप आणणारी बातमी समोर आली आहे. शेजारी राहणाऱ्या लोकांवर आरोपीनं केलेल्या चाकूहल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. कौटुंबिक वादातून आरोपीनं टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे. मुंबईच्या ग्रँड रोडवरील पार्वती मेन्शन चाळीत ही थरारक घटना घडली असून त्यानंतर आता पोलिसांनी माथेफिरू आरोपीला अटक केली आहे. चेतन गाला असं आरोपीचं नाव असून किरकोळ कारणातून त्यानं आपल्याच शेजाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केला आहे. डीबी मार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कार्यवाही केली जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Beed News : बीडमध्ये चंदन तस्करी; निवडणुकीच्या धामधुमीत दोन कोटींचे चंदन जप्त, नगरसेवकच निघाला 'पुष्पा'

MHADA News : मुंबईतील ‘या’ उपनगरात घर मिळवणे झाले सोपे; म्हाडाने बदलला नियम, आता लागणार फक्त दोन कागदपत्रे

मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी; पण मराठी लोकांनी येऊ नये, महिला HR च्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना खुशखबर.. प्रतिहेक्टरी मिळणार ५ हजार, ‘या’ दिवशी जमा होणार पैसे

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील ग्रँड रोड भागातील पार्वती मेन्शन या चाळीत राहणाऱ्या चेतन गाला या तरुणाचे शेजाऱ्यांशी किरकोळ वाद झाले होते. शाब्दिक चकमकीमुळं संतापलेल्या चेतन गालानं घरातून चाकू आणत पाच जणांवर सपासप वार केले. त्यानंतर आरडाओरडा झाल्यानंतर लोकांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी तातडीनं नायर रुग्णालयात दाखल केलं. परंतु उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला आहे. तर इतर तिघांवर उपचार सुरू असल्याची माहिती आहे. त्यानंतर आता पोलिसांनी हल्लेखोर आरोपीला घटनेच्या काही क्षणातच बेड्या ठोकल्या आहे.

हल्लेखोर चेतन गाला हा गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली असल्याची माहिती आहे. कुटुंब त्याला सोडून गेल्याचा त्याला राग होता. त्यासाठी तो शेजाऱ्यांनाच जबाबदार धरत होता. त्यामुळंच शेजाऱ्यांशी झालेल्या कुरबुरीचा राग मनात धरून चेतन गालाने पाच जणांवर चाकूहल्ला केला. त्यात जयेंद्र आणि निला मेस्त्री यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून आरोपी चेतन गाला याला अटक करण्यात आली आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा