मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Maharashtra Kesari : सांगलीची प्रतीक्षा बागडी ठरली पहिली महिला महाराष्ट्र केसरी

Maharashtra Kesari : सांगलीची प्रतीक्षा बागडी ठरली पहिली महिला महाराष्ट्र केसरी

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 24, 2023 07:42 PM IST

Pratiksha bagdi Maharashtra Kesari : सांगलीची प्रतीक्षा बागडी (Pratiksha Bagdi) ही पहिली महाराष्ट्र केसरी (First Women Maharashtra Kesari) ठरली आहे. तिने अंतिम सामन्यात कल्याणच्या वैष्णवी पाटीलचा (Vaishnavi Patil) पराभव केला.

Pratiksha bagdi Maharashtra Kesari
Pratiksha bagdi Maharashtra Kesari

Pratiksha Bagadene become first Female Maharashtra Kesari : सांगलीची प्रतीक्षा बागडी (Pratiksha Bagdi) ही पहिली महाराष्ट्र केसरी ठरली आहे. तिला चांदीची मानाची गदा सुपूर्द करण्यात आली आहे. प्रतीक्षा बागडीने अंतिम सामन्यात कल्याणच्या वैष्णवी पाटीलचा (Vaishnavi Patil) चार विरुध्द दहा गुणांनीपराभव केला.

प्रतीक्षा आणि वैष्णवी यांच्यात रंगलेली फायनलची लढत अत्यंत चुरशीची झाली. सुरुवातीला वैष्णवी पाटीलने सगल ४ गुण घेत आघाडी मिळवली होती. मात्र, पुढच्याच डावात प्रतीक्षा बागडीने वैष्णवीला चितपट करत सामना जिंकला.

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सांगलीच्या मिरजेत पार पडल्या. या स्पर्धांसाठी राज्यातील जवळपास ४०० हून अधिक महिला कुस्तीपटू दाखल झाल्या होत्या.

सांगलीच्या जिल्हा क्रीडा संकुलात या पहिल्याच महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राज्य कुस्तीगीर परिषद व सांगली जिल्हा तालीम संघातर्फे या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.

प्रतीक्षा बागडीने महाराष्ट्र केसरीचा खिताब जिंकल्यानंतर सर्वस्तरातून तिचे कौतुक होत आहे. गुरुवारपासून (२३ मार्च) ही स्पर्धा सांगलीच्या मिरजेत रंगली होती. हिंदकेसरी दिनानाथ सिंग यांच्या हस्ते कुस्तीच्या या शानदार स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले होते.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग