मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Buldhana News : पोहण्यासाठी तलावावर गेलेल्या दोन चिमुकल्यांचा गाळात फसल्याने मृत्यू

Buldhana News : पोहण्यासाठी तलावावर गेलेल्या दोन चिमुकल्यांचा गाळात फसल्याने मृत्यू

Mar 02, 2023, 02:25 PM IST

    • Buldhana chikhli news : बुलढाना जिल्ह्यातील चिखली येथे शाळेतून जेवण झाल्यावर पोहण्यासाठी पाझर तलावावर गेलेल्या दोन चिमूकल्यांचा गाळात रुतून मृत्यू झाला.
Buldhana chikhli news

Buldhana chikhli news : बुलढाना जिल्ह्यातील चिखली येथे शाळेतून जेवण झाल्यावर पोहण्यासाठी पाझर तलावावर गेलेल्या दोन चिमूकल्यांचा गाळात रुतून मृत्यू झाला.

    • Buldhana chikhli news : बुलढाना जिल्ह्यातील चिखली येथे शाळेतून जेवण झाल्यावर पोहण्यासाठी पाझर तलावावर गेलेल्या दोन चिमूकल्यांचा गाळात रुतून मृत्यू झाला.

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील काळवंड येथे एक दुर्दैवी घटना पुढे आली आहे. शाळेतून जेवण करत घरी परत जात असतांना पोहण्यासाठी पाझर तलावात गेलेल्या दोन चिमूकल्याचा पाण्याचा अंदाज न आल्याने आणि गळात रुतल्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Nagpur: ब्रेकअप झाल्यानं प्रियकर संतापला, प्रेयसी काम करत असलेले दुकानच पेटवून दिलं; नागपूर येथील घटना

Maharashtra Legislative Council Elections: विधान परिषदेच्या शिक्षक, पदवीधर निवडणुकीसाठी १० जूनला मतदान; 'या' दिवशी निकाल

Mumbai: मुंबईत निवडणूक ड्युटीवर तैनात पोलीस हवालदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

boy died in leopard attack : मामाच्या गावी आलेल्या ८ वर्षीय मुलासोबत अघटित घडलं! बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू

अनिकेत जाधव आणि आदित्य जाधव अशी मृत मुलांची नावे आहेत. हे दोघे जेवण करून शाळेतून घरी येत असतांना जनावरे पाणी पाजण्यासाठी शेतकरी तलावावर गेल्यावर ही घटना घडली. ग्रामस्थांनी तात्काळ तलावात शोध घेऊन दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढले.

अनिकेत चौथीत तर आदित्य हा पाचव्या वर्गात शिकत असून दोघेही मित्र आहेत. ते दुपारच्या सुमारास गावाशेजारी असलेल्या पाझर तलावात पोहायला गेले होते. अनिकेतला पोहायला येत होते. मात्र, आदित्यला पोहता येत नसल्यामुळे पाण्याच अंदाज न आल्याने दोघेही तलावातील गाळात फासले. यामुले त्यांना बाहेर पडता न ल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला.

संध्याकाळी गावातील शेतकरी म्हशींना पाणी पाजण्यासाठी धरणावर गेले होते. त्यांना तलावाच्या काठावर मुलांच्या चपला आणि कपडे आढळून आले. त्यामुळे शेतकऱ्याने गावात जाऊन गावकऱ्यांना ही माहिती दिली. त्यानंतर पाझर तलावात शोध घेतला असता दोघांचेही मृतदेह हाती लागले. या घटनेनं संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा