मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune bypoll election results Live Updates : पुण्यात विजय; मुंबईत काँग्रेसचा मिठाई वाटून जल्लोष

Pune bypoll election results Live Updates : पुण्यात विजय; मुंबईत काँग्रेसचा मिठाई वाटून जल्लोष

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 02, 2023 05:23 PM IST

Kasba Chinchwad Pot Nivadnuk Nikal Live updates : पुण्यातील कसबा व चिंचवड पोटनिवडणुकीपैकी कसब्याचा निकाल हाती आला आहे. तिथं महाविकास आघाडीनं बाजी मारली आहे. तर, चिंचवडमध्ये भाजप विजयाच्या उंबरठ्यावर आहे.

Ravindra Dhangekar
Ravindra Dhangekar

Maharashtra Bypoll Election Results 2023 Live updates in Marathi : पुण्यातील कसबा व चिंचवड पोटनिवडणुकीपैकी कसब्याचा निकाल हाती आला आहे. तिथं महाविकास आघाडीनं बाजी मारली आहे. तर, चिंचवडमध्ये भाजप विजयाच्या उंबरठ्यावर आहे. आतापर्यंतची माहिती जाणून घेण्यासाठी खाली स्क्रोल करत राहा…

मतमोजणीचे लाइव्ह अपडेट्स:

 

  • कसबा पेठ पोटनिवडणुकीत मविआचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या विजयाचा जल्लोष काँग्रेस मुख्यालय टिळक भवन येथे ढोल ताशांच्या गजरात मिठाई वाटून, फटाके फोडून साजरा करण्यात आला. यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, आमदार विकास ठाकरे, वजाहत मिर्झा, प्रदेश उपाध्यक्षा चारुलता टोकस, प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे, उत्कर्षा रुपवते, प्रवक्त्या भावना जैन, प्रदेश सचिव राजाराम देशमुख, झिशान अहमद, अर्चना राठोड, दत्ता नांदे, अशोक आमानकर यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Congress Celebration
Congress Celebration
  • Balasaheb Thorat : रविंद्र धंगेकर यांचा विजय खूप बोलका आहे. राज्यातील व देशातील जनता बदलाच्या दिशेनं विचार करत असल्याचं यातून स्पष्ट झालंय. सत्ताधारी पक्षानं विजयासाठी सर्व गैरमार्गाचा वापर करूनही कसबा पेठेत जनशक्तीनं महाशक्तीच्या धनशक्तीचा पराभव करून इतिहास घडवला आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

Uddhav Thackeray : कसब्यात भाजप का हरला?; उद्धव ठाकरे यांनी मोजक्या शब्दांत सांगितलं!

  • भाजपच्या 'वापरा आणि फेका' नीतीवर लोकांनी राग काढला - उद्धव ठाकरे
  • पुण्यातील निकालावर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

Pune Bypoll : लोकांनी पैसे घेतले, पण मत हृदयातल्या माणसाला दिलं; रविंद्र धंगेकर यांचं मोठं विधान

  • आजचा निकाल बोलका आहे. पुण्यातील कसब्यात जे झालं, तेच उद्या महाराष्ट्रात दिसेल - आदित्य ठाकरे
  • Maharashtra Congress : कसबा पेठ विधानसभा पोट निवडणुकीत महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजप उमेदवाराचा पराभव करून ऐतिहासिक विजय मिळवला आहे. आज दुपारी ३ वाजता दादर येथील टिळक भवनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत या विजयाचा जल्लोष करण्यात येणार आहे.
  • Ajit Pawar : हा शिंदे फडणवीसांचा पराभव आहे. सर्वसामान्यांच्या मुख्यमंत्र्यांचा सर्वसामान्यांनी पराभव केला; अजित पवार यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला
  • पोटनिवडणुकीत नियमानुसार प्रचार झाला असता तर आम्ही दोन्ही जागा जिंकल्या असत्या. कसब्यात आमचं विजयी मताधिक्य वाढलं असतं - अजित पवार
  • कसब्यातील विजयी ५० टक्के रवींद्र धंगेकर यांचा आणि ५० टक्के महाविकास आघाडीचा आहे - अजित पवार

  • पुढच्या निवडणुकीत चिंचवडमध्ये किंवा अन्य कुठंही बंडखोरी होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल - अजित पवार
  • वंचित आघाडीनं राहुल कलाटे यांना पाठिंबा दिल्याचा काहीही फटका बसलेला नाही. वंचितचे तिथले अनेक लोक राष्ट्रवादीत आले होते. मात्र, काही लोकांनी राहुल कलाटे यांना मतं दिली. तिथं मतांची विभागणी झाली - अजित पवार
  • जनतेनं एकदा ठरवलं की कोणी कितीही प्रयत्न करो, काही होणार नाही. राज्यातलं हे सरकार लोकांना पटलेलं नाही हे लक्षात घ्या - अजित पवार
  • नाना काटे आणि राहुल कलाटे यांची मतं पाहिल्यास ती भाजपच्या उमेदवारापेक्षा जास्त आहे. तिथंही चुरशीची लढत देण्याचा प्रयत्न आघाडीनं केलाय. तिन्ही पक्ष नीट एकत्र आले. जागांचं व्यवस्थित वाटप झालं. लोकांमध्ये नाव असलेला उमेदवार दिला तर पुढच्या निवडणुकांमध्ये चांगलं यश मिळाल्याशिवाय राहणार नाही - अजित पवार
  • पन्नास टक्के यश आणि पन्नास टक्के अपयश मिळालं. सत्ताधाऱ्यांनी सर्व प्रयत्न करूनही कसब्यात त्याचा परिणाम झाला नाही. त्याबद्दल रवींद्र धंगेकर यांच्यासह सर्व मतदार, कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो - अजित पवार
  • कसबा मतदारसंघातील आतापर्यंतच्या निवडणुकांचं नीट विश्लेषण केल्यास आपल्याला हे लक्षात येईल की यापूर्वी तिरंगी लढतींमुळं हा मतदारसंघ भाजपकडं राहिला होता. तरीही यावर आत्मचिंतन करावं लागेल. आम्ही कुठं कमी पडलो हे पाहावं लागेल - हेमंत रासने
  • मी स्वत: कमी पडलो, भाजपचे पराभूत उमेदवार हेमंत रासने यांची प्रतिक्रिया
  • चिंचवडमध्ये मतमोजणी अद्यापही सुरूच. १५ व्या फेरीअखेर अश्विनी जगताप यांना ५२,७५६ मते. नाना काटे यांना ४३,६५७ तर अपक्ष राहुल कलाटे यांना १६,९१४ मतं
  • भाजपचा बालेकिल्ला ढासळला! कसब्यात महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांचा दणदणीत विजय. ११,०४० मतांनी धंगेकरांनी मारली बाजी
  • कसब्यात मतमोजणीच्या १७ फेऱ्या पूर्ण. महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर १० हजार ३०० मतांनी आघाडीवर.
  • शेवटच्या फेरीपर्यंत माझी आघाडी कायम राहणार. विजयानंतर महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना भेटणार - रवींद्र धंगेकर
  • सोळाव्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर ६,१०० मतांनी आघाडीवर
  • Ashwini Jatap Vs Nana Kate : चिंचवड विधानसभा मतदारसंघात दहाव्या फेरीअखेर भाजपच्या अश्विनी जगताप आघाडीवर. जगताप यांना ३५,९३७ मतं तर, त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे नाना काटे यांना २८,५११ मतं. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे बंडखोर राहुल कलाटे यांना ११,४२९ मतं.
  • Ravindra Dhangekar : मतमोजणीच्या बाराव्या फेरीअखेर रवींद्र धंगेकर ४ हजार ६१२ मतांनी आघाडीवर. धंगेकर यांना ४५,५०४ मते, तर हेमंत रासने यांना ४०८९२ मते.
  • Sanjay Raut on Chinchwad Election : चिंचवडच्या जागेबद्दलही आम्ही आशावादी आहोत. तिथला पूर्ण निकाल येऊ द्या, भाजपला घाम फुटलेला दिसेल. चिंचवड हा काही भाजपचा गड नाही. तिथं जगताप कुटुंबाचं वर्चस्व आहे - संजय राऊत
  • Sanjay Raut on Kasba Election : महाविकास आघाडी महाराष्ट्रात किती मजबुतीनं पुढं जातेय याचं कसबा हे उदाहरण आहे. कसब्यात आतापर्यंत भाजपचा विजय शिवसेनेच्या पाठिंब्यामुळं झाला होता. आज शिवसेना महाविकास आघाडीसोबत आहोत, त्याचा परिणाम कसब्यात दिसतोय - संजय राऊत
  • अकराव्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर ३,१२२ मतांनी आघाडीवर
  • Chhagan Bhujbal : कसब्याची निवडणूक भाजपनं प्रतिष्ठेची केली होती. ती जागा आज महाविकास आघाडीकडं येतेय असं दिसतंय. सध्याचा कल पाहता चिंचवडची जागा भाजपला मिळू शकते. पण या दोन्ही जागा भाजपकडं होत्या हे लक्षात घ्यायला हवं. त्यातील एक जागा जरी महाविकास आघाडीनं जिंकली तर तो भाजपला मोठा धक्का असेल - छगन भुजबळ
  • Kasba Election Results : नवव्या फेरीनंतर रवींद्र धंगेकर ४ हजार ९०० मतांनी आघाडीवर
  • उमेदवारी मिळाली तेव्हाच माझा विजय निश्चित झाला होता. प्रचार हा औपचारिक होता. मागची ३० वर्षे राजकीय, सामाजिक काम करत असताना जातीधर्माच्या भिंती तोडून काम केलं. लोकांची सेवा करत गेलो. मी जनतेचा उमेदवार आहे. त्यामुळं मला विजयाचा विश्वास आहे. किमान १५ हजार पेक्षा जास्त मतांनी माझा विजय होईल - रवींद्र धंगेकर
  • मतमोजणीच्या आठव्या फेरीअखेर रवींद्र धंगेकर यांना ३,३२५ हजार मतांची आघाडी. धंगेकर यांना ३०,५०० तर हेमंत रासने यांना २७,१७५ मते.
  • Chinchwad bypoll results Update : चौथ्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप यांना ६१६ मतांची आघाडी, अश्विनी जगताप यांना १३,८८० तर नाना काटे यांना ११,३५१ मते
  • Kasba Election Counting : पाचव्या फेरीनंतर महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर पुन्हा आघाडीवर. तब्बल ३ हजार मतांची आघाडी
  • चौथ्या फेरीअखेर भाजपचे उमेदवार हेमंत रासने हे एकूण ६०० मतांनी महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर यांचा पेक्षा आघाडीवर आहे. रासने यांना ३५०९ मते तर धंगेकर यांना ३१३० मते मिळाली आहेत.
  • Ravindra Dhangekar vs Hemant Rasane : कसबा मतदार संघाच्या तिसऱ्या फेरीत भाजपचे उमेदवार हेमंत रासने हे काही मतांनी आघाडीवर आहेत. तर रविंद्र धंगेकर जे पुढे होते ते आता पिछाडीवर गेले आहेत.
  • कसबा मतदार संघाची मत मोजणीची दुसरी फेरी सुरू असून रविंद्र धंगेकर यांना ८६३१ मते तर हेमंत रासने यांना ६९४६ मते मिळाली आहे. दुसऱ्या फेरीनंतर रवींद्र धंगेकर १६६८ मतांनी आघाडी मिळवली आहे.
  • कसबा मतदार संघातून रविंद्र धंगेकर यांना ५८४४ तर हेमंत रासने यांना २८६३ मते मिळाली आहेत.
  • कसबा पोटनिवडणुकीत पहिल्या फेरीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून यात महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर यांना ३ हजार मतांची आघाडी मिळाली आहे.
  • विजयाबद्दल माझ्या मनात कुठलीही धाकधूक नाही. या निवडणुकीत १ लाख मते मिळावी अशी अपेक्षा आहे; अश्विनी जगताप यांची प्रतिक्रिया
  • चिंचवड येथे ईव्हीएममशीन मधील मतमोजणी करण्यास सुरुवात झाली आहे. यात भाजपच्या अश्विनी जगताप या आघाडीवर आहेत. नाना काटे हे पिछाडीवर आहेत. जगताप यांना ४ हजार मते मिळाली आहेत. तर काटे यांना ३ हजार ५०० मते मिळाली आहे. जगताप या ४०० मतांनी आघाडीवर आहे.
  • चिंचवड येथे पोस्टल मतपत्रिकांची मतमोजणी सुरू झाली असून तेथे समर्थकांनी निकालाआधीच भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांच्या विजयी कट आऊट लावले गेले असून जल्लोषाला सुरुवात करण्यात आली आहे.
  • कसबा मतदार संघाची पोस्टल मत मोजली जात असून यात महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर हे आघाडीवर आहेत. भाजपचे उमेदवार हेमंत रासने हे पिछाडीवर आहेत.
  • चिंचवड येथे सकाळी ८ वाजता पोस्टल मतदान मोजणीला सुरुवात झाली आहे. ही मोजणी पूर्ण झाली असून यात भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी आघाडी घेतली आहे.
  • पोस्टल मतदान मोजण्यास सुरुवात झाली आहे. तब्बल दीड हजार नागरिकांनी या प्रकारे मतदान केले आहे. या साठी तब्बल अर्धा तास लागणार आहे. त्यानंतर मुख्य मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
  • ही निवडणूक भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यासाठी प्रतिष्ठेची असणार आहे. त्यामुळे सगळ्या नेत्यांचं आणि राज्याचं या निवडणुकीकडे लक्ष लागलं आहे. सत्तांतर झाल्यानंतरही ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीवरुन राज्याची पुढची गणितं ठरणार आहे.
  • मतदानाच्या दिवशी आचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी हेमंत रासने, रविंद्र धंगेकर यांच्यावर निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल केला आहे.
  • पुण्याच्या पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि महाविकास आघाडीचे नेते गेल्या काही दिवसांपासून पुण्यात ठाण मांडून बसले होते. या दरम्यान अनेक आरोप प्रत्यारोप देखील झाले.

  • कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक राज्यभरात गाजली. या निवडणुकीत भाजपचे हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर यांच्यात थेट लढत झाली.
  • मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने ज्या व्यक्तींना ओळखपत्र दिले आहे अशा व्यक्तींखेरिज इतरांना या भवनाच्या १०० मीटर परिसरात प्रवेश असणार नाही. मतमोजणीच्या दिवशी अंतिम निकाल जाहीर होईपर्यंत तापकीर चौक ते थेरगाव रुग्णालयाकडे जाणारा रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
  • चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीच्यादृष्टीने निवडणूक यंत्रणेची आवश्यक सर्व तयारी पुर्ण झाली असून मतमोजणीसाठी प्रत्येकी १४ टेबल अधिक टपाली मतपत्रिकांसाठी १ टेबल असे एकूण १५ टेबल असणार आहेत. १८ पर्यवेक्षक, १८ सहायक आणि १८ सूक्ष्म निरीक्षकांची यासाठी नेमणूक करण्यात आली आहे.
  • पिंपरी-चिंचवड येथे मतमोजणीच्या ३७ फेऱ्या होणार आहेत. येथील केंद्राला इटीपीबीएस( इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम फॉर सर्व्हीस वोटर) या प्रणालीच्या प्रात्यक्षिक कामकाजाची माहिती जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी घेतली.
  • दोन्ही ठिकाणी प्रारंभी टपाली मतपत्रिकेच्या मोजणीला सुरुवात करण्यात येणार आहे. त्यानंतर टेबलवरील मतमोजणीला सुरुवात होईल. कसब्याच्या मतमोजणीकरिता १६ टेबल अशी व्यवस्था केली असून मतमोजणीच्या २० फेऱ्या होणार आहेत. एकूण १८० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. २७० कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत. क्षेत्रीय अधिकाऱ्यांची संख्या २५ आहे.

Votes Couting
Votes Couting
  • राज्यभरात बहुचर्चित ठरलेली कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी रविवारी (दि २६) मतदान झाले. आज गुरुवारी मतमोजणी होणार आहे.
  • कसबा मतदारसंघांची मतमोजणी भारतीय खाद्य गोदाम, तर चिंचवडची मतमोजणी थेरगाव येथील शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथे होणार आहे. मतमोजणीची सर्व तयारी प्रशासनाने केली आहे. मतमोजणी सुरळीत पार पडावी, तसेच तांत्रिक अडचणी येऊ नये यासाठी दक्षता घेतली जाणार आहे.

IPL_Entry_Point