मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Bypoll : लोकांनी पैसे घेतले, पण मत हृदयातल्या माणसाला दिलं; रविंद्र धंगेकर यांचं मोठं विधान

Pune Bypoll : लोकांनी पैसे घेतले, पण मत हृदयातल्या माणसाला दिलं; रविंद्र धंगेकर यांचं मोठं विधान

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 02, 2023 01:19 PM IST

Ravindra Dhangekar reaction on Victory in kasba Bypoll : अवघ्या राज्याचे लक्ष असलेल्या कसबा पेठ विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला. निकाला नंतर त्यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

रविंद्र धंगेकर
रविंद्र धंगेकर

पुणे : भाजपचा गड समजल्या जाणाऱ्या कसबापेठ मतदार संघाच्या पोटनिंवडणुकीला महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी खिंडार पाडले आहे. त्यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा ११ हजार ४०० मतांनी पराभव केला. निकालानंतर कार्यकर्त्यांनी गुलाल आणि फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला.

ट्रेंडिंग न्यूज

दरम्यान, मध्यमांशी बोलतांना धंगेकर म्हणाले, “लोकांनी पैसे घरात ठेवले आणि ह्रदयातला धंगेकर काढून मतदानाला आले. महाविकास आघाडीच्या विजयाची इथून सुरुवात झाली आहे. ती राज्यातही सत्ता घेणार आहे. भाजपाला जनतेनं कात्रजचा घाट दाखवला आहे. माझ्या पत्नीने कालच आपल्या विजयाची खात्री व्यक्त केली होती. हा लोकशाहीचा विजय आहे. मी सर्वसमावेशक राजकारण केल्यामुळे त्याचं हे चित्र दिसतंय. ज्या वेळी मुख्यमंत्री हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी मतदार संघात आले त्यांच वेळी माझ्या विजय झाला होता. भाजपने मोठ्या प्रमाणात पैसे वाटप करून लोकांना पालटवल्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी त्यांचे ऐकले नाही. निकाल लागल्यावर आता खासदार गिरीश बापट यांना भेटणार असल्याचे देखील धंगेकर म्हणाले.

रवींद्र धंगेकर यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रासने यांचा ११ हजार ४० मतांनी पराभव केला आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच रवींद्र धंगेकर हे आघाडीवर होते. एखाद्या फेरीचा अपवाद वगळता त्यांनी अखेरपर्यंत ही आघाडी कायम राखली आणि शेवटच्या फेरीनंतर निवडणूक आयोगानं त्यांच्या विजयाची घोषणा केली.

भाजपनं पहिल्या दिवसापासूनच ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र, महाविकास आघाडीनं रवींद्र धंगेकर यांच्यासारखा दांडगा जनसंपर्क असलेला उमेदवार दिल्यामुळं भाजपसाठी ही निवडणूक कठीण झाली होती. त्यातच हिंदू महासंघानं भाजपला विरोध करत उमेदवार उभा केल्यानं वातावरण अधिकच बदललं होतं. भाजपच्या हक्काच्या सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठ इथंही हेमंत रासने यांना आघाडी मिळाली. मात्र, धंगेकरांनाही तिथल्या मतदारांनी चांगली साथ दिल्याचं दिसलं. त्याचंच प्रतिबिंब निकालात पडल्याचं मानलं जात आहे.

IPL_Entry_Point

विभाग