मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  व्हिडिओ दोघांचा अन् बदनामी फक्त शीतल म्हात्रेंची; सुषमा अंधारेंनी शिंदे गटाची नस पकडली!

व्हिडिओ दोघांचा अन् बदनामी फक्त शीतल म्हात्रेंची; सुषमा अंधारेंनी शिंदे गटाची नस पकडली!

Mar 14, 2023, 06:18 PM IST

    • sheetal mhatre viral video case : शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांचा ओरिजनल व्हिडिओ कुठे आहे?, असा सवाल ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी उपस्थित केला आहे.
sushma andhare on sheetal mhatre viral video case (HT)

sheetal mhatre viral video case : शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांचा ओरिजनल व्हिडिओ कुठे आहे?, असा सवाल ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी उपस्थित केला आहे.

    • sheetal mhatre viral video case : शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांचा ओरिजनल व्हिडिओ कुठे आहे?, असा सवाल ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी उपस्थित केला आहे.

sushma andhare on sheetal mhatre viral video case : शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे आणि माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळं ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार राजकीय वादंग पेटलेलं असून या प्रकरणात मुंबई पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे. याशिवाय शिंदे-फडणवीस सरकारनं या प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु आता शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांचा ओरिजनल व्हिडिओ कुठे आहे?, असा सवाल करत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. याशिवाय या प्रकरणात फक्त शीतल म्हात्रे यांचीच बदनामी केली जात असून विरोधकांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप अंधारे यांनी केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Buldhana Bus Accident : बुलढण्यात एसटी व खासगी बसचा भीषण अपघात; एक महिला ठार, २५ प्रवासी जखमी

IMD High wave alert : सावधान! येत्या ३६ तासांत समुद्रात जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता

Mumbai Crime : कॉन्स्टेबल विशाल पवारच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण, विषारी इंजेक्शन कथेचा बनाव? सीसीटीव्ही फुटेज मिळाले

Pune Crime : बायको नांदायला येत नसल्याने तरुणाचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांची उडाली तारांबळ

माध्यमांशी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, व्हायरल व्हिडिओमध्ये एक नाही तर दोन व्यक्ती दिसून येत आहेत. परंतु आमदार प्रकाश सुर्वे हे फ्रेममध्ये कुठेही नाहीयेत. सगळीकडे फक्त शीतल म्हात्रे याच बाजू मांडत आहेत. त्यामुळं व्हिडिओमध्ये दोघे असताना एकाच व्यक्तीला का बदनाम केलं जात आहे?, महिलेच्या खांद्यावर बंदूक ठेवून विरोधकांना संपवण्याचा षडयंत्र केलं जात असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे. शीतल म्हात्रेंचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ मॉर्फ असल्याचा दावा शिंदे गट करत असेल तर त्यांचा ओरिजनल व्हिडिओ कुठे आहे?, असाही सवाल अंधारेंनी केला आहे.

शीतल म्हात्रेंची बदनामी करण्याचा प्रयत्न- अंधारे

शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरणात पोलिसांनी आमच्या ज्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्या गुन्ह्यांच्या कलमांचं स्वरुप पाहता पोलिसांचा अभ्यास कच्चा असल्याचं दिसून येतो. पोलिसांचा अभ्यास कच्चा आहे की ठरवून शीतल म्हात्रे यांचीच बदनामी केली जात आहे?, असा सवाल उपस्थित होत असल्याचं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.