मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Subhash Desai : सुभाष देसाई सुद्धा शिंदे गटात प्रवेश करणार?; मुलगा भूषण म्हणाला…

Subhash Desai : सुभाष देसाई सुद्धा शिंदे गटात प्रवेश करणार?; मुलगा भूषण म्हणाला…

Mar 13, 2023, 08:27 PM IST

  • Bhushan desai join Eknath shinde faction : भूषण देसाई यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला. भूषण देसाई यांनी या पक्षप्रवेशाचं कारणही सांगितलं, तसंच सुभाष देसाईदेखील शिवसेनेत प्रवेश करणार का? यावरही भूषण देसाई यांनी उत्तर दिलं आहे.

भूषण देसाईंचा शिंदे गटात प्रवेश

BhushandesaijoinEknathshinde faction : भूषण देसाई यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला. भूषण देसाई यांनी या पक्षप्रवेशाचं कारणही सांगितलं,तसंच सुभाष देसाईदेखील शिवसेनेत प्रवेश करणार का?यावरही भूषण देसाई यांनी उत्तर दिलं आहे.

  • Bhushan desai join Eknath shinde faction : भूषण देसाई यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला. भूषण देसाई यांनी या पक्षप्रवेशाचं कारणही सांगितलं, तसंच सुभाष देसाईदेखील शिवसेनेत प्रवेश करणार का? यावरही भूषण देसाई यांनी उत्तर दिलं आहे.

ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून मातोश्रीच्या अत्यंत जवळचे असलेल्या सुभाष देसाई यांच्या मुलाने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई यांनी एकनाथ शिंदे यांची साथ द्यायचा निर्णय घेतला आहे. सुभाष देसाई यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या टीममध्ये काम केलं होतं,  तसंच ते २०१४ च्या भाजप-शिवसेना सरकारमध्ये आणि महाविकासआघाडी सरकारमध्येही उद्योगमंत्री होते.

ट्रेंडिंग न्यूज

Buldhana Bus Accident : बुलढण्यात एसटी व खासगी बसचा भीषण अपघात; एक महिला ठार, २५ प्रवासी जखमी

IMD High wave alert : सावधान! येत्या ३६ तासांत समुद्रात जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता

Mumbai Crime : कॉन्स्टेबल विशाल पवारच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण, विषारी इंजेक्शन कथेचा बनाव? सीसीटीव्ही फुटेज मिळाले

Pune Crime : बायको नांदायला येत नसल्याने तरुणाचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांची उडाली तारांबळ

भूषण देसाई यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला. भूषण देसाई यांनी या पक्षप्रवेशाचं कारणही सांगितलं, तसंच सुभाष देसाई देखील शिवसेनेत प्रवेश करणार का? यावरही भूषण देसाई यांनी उत्तर दिलं आहे.

भूषण देसाई म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे हेच माझे दैवत आहेत. महाराष्ट्राचा विकास आणि बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाण्याचे काम एकनाथ शिंदे करत आहेत. शिंदे यांचे काम मी जवळून पाहिले आहे. त्यांच्या कामाची पद्धतही मला माहीत आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला असल्याचे भूषण देसाई यांनी म्हटले.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांना माझ्या निर्णयाबद्दल आधीच कल्पना दिली होती, असे भूषण देसाई यांनी स्पष्ट केले. माझ्या वडिलांची एक राजकीय भूमिका असू शकते. मात्र, माझी स्वत: ची एक वेगळी राजकीय भूमिका असू शकते, असेही त्यांनी म्हटले.  

सुभाष देसाई सुद्धा शिंदे गटात येणार आहे का? या प्रश्नावर भूषण देसाई यांनी म्हटलं की, मी याबद्दल सध्या काही सांगू शकत नाही, माझी इतकीच मर्यादा आहे, मला तसं सांगता येणार नाही. तिकडे काय पद्धतीने काम चालू आहे, याबद्दल जास्त बोलणार नाही.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा