मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Bhushan Desai : उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का; विश्वासू नेत्याच्या मुलाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Bhushan Desai : उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का; विश्वासू नेत्याच्या मुलाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 13, 2023 07:47 PM IST

Subhash Desai son Bhushan desai joins Eknath Shinde Camp : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील जेष्ठ नेते सुभाष देसाई यांच्या पुत्रांनी शिंदे गटात प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे.

Bhushan Desai
Bhushan Desai

Bhushan Desai Quits Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray: खासदार गजानन कीर्तिकर यांच्या सोडचिठ्ठीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आणि पक्षातील जेष्ठ नेते सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला आहे. बाळासाहेब भवनात मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत भूषण देसाई यांचा पक्ष प्रवेश झाला. शिंदे गटाला मिळणारा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत आहे. यापूर्वी अनेक आमदार, नगरसेवकांसह ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

दरम्यान, सिंधुदर्गमध्ये पक्षाच्या सभेत सुभाष देसाई यांनी शिवसेनेत पडलेल्या फुटीवर भाष्य केले होते. उद्धव ठाकरेंसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार असल्याचे त्यांनी त्यावेळी म्हटले होते. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर सुभाष देसाई ठामपणे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहीले. मात्र, आता त्यांचे पुत्र भूषण देसाई यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

"भूषण देसाई यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेधन सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर सुभाष देसाई आमच्या पक्षात सामील झाले आहेत. आमचं सरकार हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारे सरकार आहे. अनेक पक्षातील नेते आमच्यासोबत येत आहेत", असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय.

"सुभाष देसाई हे शिवसेनेचे जेष्ठ नेते आहेत. शिवसेनेला मोठे करण्यात सुभाष देसाई यांचा मोलाचा वाटा आहे, यात त्यांच्या मुलाचा काहीही हातभार नाही. भूषण देसाई स्वतःच्या फायद्यासाठी आणि दबावाला बळी पडून शिवसेनेत गेले. आठ वर्षे वडिलांच्या मंत्रिमंडळाचा फायदा घ्यायचा आणि मग पक्ष सोडायचा असे सुरू आहे", अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.

IPL_Entry_Point

विभाग