मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nashik: नाशिकमध्ये मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरूणीसोबत घडलं विपरीत

Nashik: नाशिकमध्ये मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरूणीसोबत घडलं विपरीत

Mar 22, 2023, 03:51 PM IST

  • Nashik Drowning: महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील सोमेश्वर धबधब्यावर मित्रांसोबत फिरायला गेलेल्या तरूणीचा पाण्यात पडून मृत्यू झाला आहे.

Nashik Police

Nashik Drowning: महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील सोमेश्वर धबधब्यावर मित्रांसोबत फिरायला गेलेल्या तरूणीचा पाण्यात पडून मृत्यू झाला आहे.

  • Nashik Drowning: महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील सोमेश्वर धबधब्यावर मित्रांसोबत फिरायला गेलेल्या तरूणीचा पाण्यात पडून मृत्यू झाला आहे.

Nashik  Shocking: नाशिक शहरातील सोमेश्वर धबधबा येथे मित्रांसह फिरायला गेलेल्या तरूणीसोबत अतिशय दुर्देवी घटना घडली. सोमेश्वर धबधब्याजवळ सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरल्याने तरूणीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ahmednagar accident : अहमदनगरमध्ये ओव्हरटेक करण्याच्या नादात एसटी-कारचा भीषण अपघात; ४ ठार, ३ जखमी

Pune vishrantwadi murder : भांडणे सोडवायला गेला अन् जीव गमावून बसला! पुण्यातील विश्रांतवाडी येथील घटना

Maharashtra Weather Update: विदर्भ, मराठवाड्यात पुढील ३ दिवस पावसाचे! ठाणे रायगडमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा

परभणीत ऑनर किलिंग..! प्रेम विवाहाला विरोध करत आई-बापाने पोटच्या मुलीचा केला ‘सैराट’ अंत

मिळालेल्या माहितीनुसार, शिवांगी जयशंकर सिंह, असे मृत्यू झालेल्या तरूणीचे नाव आहे. शिवांगी ही तिचा मित्र आदित्य देवरे यांच्यासमोत सोमेश्वर धबधबा येथे फिरायला गेली होती. त्यावेळी धबधब्याजवळ सेल्फी काढताना तिचा पाय घरसला आणि ती पाण्यात पडली. यावेळी त्याठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्वरीत तिला नदीपात्रातून बाहेर काढून जवळच्या जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेत शिवानीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

उन्हाळा लागला की सोमेश्वर धबधब्यावर पर्यटकांची गर्दी जमायला सुरुवात होते. याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी पर्यटनस्थळी गेल्या सतर्क आणि स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मात्र, अनेकजण प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून आपला जीव धोक्यात टाकतात.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा