मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शेततळ्यावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या बहिण-भावावर काळाचा घाला

शेततळ्यावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या बहिण-भावावर काळाचा घाला

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 08, 2022 07:54 PM IST

पाण्यात बडून दुर्देवी मृत्यू : अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील मोधळवाडी येथील घटना

मृत बहीण भाऊ
मृत बहीण भाऊ

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील मोधळवाडी येथे रविवारी दुर्देवी घटना घडली. शेततळ्यावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या भावंडावर काळाने घाला घातला. ही दोघे कपडे धूत असतांना त्यांचा पाय घसरून शेततळ्यात पडल्याने बडून मृत्यू झाला.

जयश्री बबन शिंदे ( वय २१ ) आणि आयुष बबन शिंदे ( वय ७ वर्ष ) असे मृत बहिण - भावाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपळगाव देपा गावांतर्गत असलेल्या मोधळवाडीतील घाणेवस्ती येथे बबन चांगदेव शिंदे हे आपल्या कुटुंबासमवेत राहातात. रविवारी सकाळी मुलगी जयश्री व मुलगा आयुष हे दोघे बहीण- भाऊ कपडे धुण्यासाठी त्यांच्याच शेतात असलेल्या शेततळ्यावर गेले होते. आयुष हा शेततळ्यातून पाणी काढत असताना त्याच दरम्यान त्याचा पाय घसरला आणि तो शेततळ्यात पडला. भाऊ शेततळ्यात पडला त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी बहीण जयश्री हिने मागचा पुढचा विचार न करता शेततळ्यात उडी मारली. मात्र, तिला पोहता येत नव्हते. दरम्यान दोघेही खोल पाण्यात बुडाले.

त्यांच्या आरडा ओरडण्याने ते पाण्यात बुडाल्याचा संशय आजूबाजुच्या नागरिकांना आला. दरम्यान त्यांनी शेततळ्याकडे धाव घेतली. नागरिकांनी दोघांनाही शेततळ्यातून बाहेर काढण्यात आले. मात्र मात्र त्यांचा दुदैर्वी मृत्यू झाला होता. दोघांचेही मृत्यूदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील कुटीर रूग्णालयात नेण्यात आले. बहीण- भावाच्या दुदैर्वी मृत्यूने पिंपळगाव देपा गावासह पठारभागावर शोककळा पसरली आहे.

WhatsApp channel