मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nashik Shocking: शाळेतून घरी जाताना स्कूल व्हॅनने चिरडले; आठ वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

Nashik Shocking: शाळेतून घरी जाताना स्कूल व्हॅनने चिरडले; आठ वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

Jun 30, 2023, 06:41 PM IST

  • Nashik Accident: शाळेतून घरी जाताना स्कूल व्हॅनने चिरडल्याने एका आठ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे.

Road Accident In Nashik (HT)

Nashik Accident: शाळेतून घरी जाताना स्कूल व्हॅनने चिरडल्याने एका आठ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे.

  • Nashik Accident: शाळेतून घरी जाताना स्कूल व्हॅनने चिरडल्याने एका आठ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे.

Nashik News: नाशिक शहरातील जेलरोड परिसरात स्कूल व्हॅनने चिरडल्याने एका आठ वर्षाच्या मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. शाळेतून घरी सोडवायला आलेल्या स्कूल व्हॅनमधून खाली उतरल्यानंतर चालकाने अचानक गाडी मागे घेतल्याने हा अपघात घडला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Abhishek Ghosalkar : घोसाळकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट; घटनेचे सीसीटीव्ही फुटेज कुटुंबियांना दाखवा, हायकोर्टाचे आदेश

Mumbai News : नायर रुग्णालयाच्या १५ व्या मजल्यावरून उडी मारून कर्मचाऱ्याची आत्महत्या

vijay wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणी भाजप आक्रमक; विजय वडेट्टीवारांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

ICSE Result 2024 : ठाण्यातील रेहान सिंह बारावी ICSE बोर्डात भारतात पहिला, केवळ एका गुणाने हुकले १०० टक्के

मिळालेल्या माहितीनुसार, अपेक्षा नवज्योत भालेराव असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. दरम्यान, नवीन मराठी या शाळेची स्कूल व्हॅन अपेक्षा घरी सोडवण्यासाठी आली  होती. या व्हॅनमधून अपेक्षा खाली उतरल्यानंतर पाठीमागून जात असताना चालकाने अचानक गाडी मागे घेतली. त्यावेळी मागच्या चाकाखाली चिडरल्याने अपेक्षाला गंभीर दुखापत झाली. तिला त्वरीत नाशिक रोड परिसरातील जयराम रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. हृदय पळवटून टाकणाऱ्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत. मात्र, घरातील अवघ्या वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याने भालेराव परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा