मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nashik: पॉर्न साईटवरील अश्लील व्हिडिओ दाखवत पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार; पतीविरोधात गुन्हा दाखल

Nashik: पॉर्न साईटवरील अश्लील व्हिडिओ दाखवत पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार; पतीविरोधात गुन्हा दाखल

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 04, 2023 01:55 PM IST

Nashik Shocking: माहेरहून रोख ४५ लाख रुपये आणि ५० तोळे सोने आणले नाहीत म्हणून पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.

Crime
Crime

Nashik Horror: महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी सरकार, पोलीस प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जात आहेत. मात्र, तरीही अशाप्रकारच्या घटना कानावर पडत आहेत. नाशिक शहरातील सिडको परिसरात पत्नीचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात पतीसह सासू- सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने फिर्यादी महिलेला माहेरहून रोख ४५ लाख रुपये आणि ५० तोळे सोने आणायला सांगितले. मात्र, या महिलेने मागणी पूर्ण ने केल्याने आरोपीने पॉर्न साईटवरील अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी अंबड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलाचे २००९ मध्ये लग्न झाले आहे. यावेळी पीडितेच्या माहेरील मंडळींनी मुलीस स्त्रीधन म्हणून सुमारे ३० तोळे सोने दिले होते. वैवाहिक जीवनाला सुरुवात होताच महिलेचा छळ करण्यास सुरुवात झाली. पती आणि सासरच्या मंडळींनी पीडिताला माहेरहून ४५ हजार आणि ५० तोळे सोने आणण्याचा तगदा लावला. तसेच पीडितेचा मानसिक आणि शारीरिक छळ करू लागले. त्यानंतर तिच्या पतीने पॉर्न साईटवरील अश्लील व्हिडिओ दाखवत अनैसर्गिक कृत्य केले. याप्रकरणी पीडिताने अंबड पोलीस ठाण्यात पतीसह सासू-सासऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजीत दीक्षित, सुदाम दीक्षित, आणि पुष्पलता दीक्षित यांच्याविरोधात नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

IPL_Entry_Point

विभाग