मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Washim Road Accident: वाशिम जिल्ह्यात भरधाव ट्रॅक्टरची ऑटोरिक्षाला धडक; दोघांचा मृत्यू, १२ जण जखमी

Washim Road Accident: वाशिम जिल्ह्यात भरधाव ट्रॅक्टरची ऑटोरिक्षाला धडक; दोघांचा मृत्यू, १२ जण जखमी

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 04, 2023 11:58 AM IST

Road Accident: वाशिम जिल्ह्यात रस्ता अपघातात २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १२ जण जखमी झाले आहेत.

Accident
Accident (HT)

Accident: वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर- अकोला महामार्गावरील पार्डी ताड फाट्याजवळ भरधाव ट्रॅक्टरने ऑटोरिक्षाला धडक दिली. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, १२ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला.

ट्रेंडिंग न्यूज

वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर- अकोला महामार्गावरील पार्डी ताड फाट्याजवळ काल सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास भरधाव ट्रॅक्टरने ऑटोरिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत ऑटोरिक्षाने दोन पलट्या मारल्या. या अपघात इतका भीषण होता की, दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, १२ जण जखमी झाले आहेत. जखमींना मंगरुळपीर आणि अकोला येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. या ऑटोरिक्षामधील सर्व प्रवासी मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथील रहिवासी आहेत. एकाच गावातील दोन जणांच्या मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा परसली आहे.

संभाजीनगरमध्ये एसटी बस-टेम्पोची समोरासमोर भीषण धडक

छत्रपती संभाजीनगरमध्ये एसटी बस आणि गॅस सिलिंडरची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. बस व टेम्पोची समोरासमोर धडक झाली. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास सिल्लोड- पाचोरा महामार्गावरील वांगी फाट्याजवळ हा भीषण अपघात झाला. बस व टेम्पोची धडक इतकी भीषण होती की, बसच्या पुढील भागाचा चेंदामेंदा झाला आहे. तर टेम्पो मधील गॅस सिलिंडर रस्त्यावर विखुरले होते. अपघातस्थळाचे दृष्य खूपच विदारक होते. या अपघातात टेम्पोचा चालक जागीच ठार झाला आहे. इतर जखमींना उपजिल्हा रुग्णालय सिल्लोड येथे हलवले गेले.

IPL_Entry_Point

विभाग