मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Aaditya Thackeray : “पेंग्विन म्हटल्याचा अभिमान, आता कोस्टल रोड..” विरोधकांना आदित्य ठाकरेंचे उत्तर

Aaditya Thackeray : “पेंग्विन म्हटल्याचा अभिमान, आता कोस्टल रोड..” विरोधकांना आदित्य ठाकरेंचे उत्तर

Sep 30, 2022, 10:13 PM IST

    • विरोधकांकडून शिवसेना नेते आदित्य ठाकरे  (Aaditya Thackeray) यांच्यावर टीका करताना पेंग्विनचा असा उल्लेख केला जातो. आता आदित्य ठाकरेंनी यावर आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले आहे. पेंग्विन म्हटल्याचा मला अभिमान आहे, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.
नवरात्र उत्सवानिमित्त आदित्य ठाकरे पुणे दौऱ्यावर

विरोधकांकडून शिवसेना नेते आदित्य ठाकरे(Aaditya Thackeray) यांच्यावर टीका करताना पेंग्विनचा असा उल्लेख केला जातो. आता आदित्य ठाकरेंनी यावरआदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले आहे.पेंग्विन म्हटल्याचा मला अभिमान आहे, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.

    • विरोधकांकडून शिवसेना नेते आदित्य ठाकरे  (Aaditya Thackeray) यांच्यावर टीका करताना पेंग्विनचा असा उल्लेख केला जातो. आता आदित्य ठाकरेंनी यावर आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले आहे. पेंग्विन म्हटल्याचा मला अभिमान आहे, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.

पुणे –विरोधकांकडून शिवसेना नेतेआदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर टीका करताना पेंग्विनचा असा उल्लेख केला जातो. आता आदित्य ठाकरेंनी यावरआदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले आहे. पेंग्विन (penguin) म्हटल्याचा मला अभिमान आहे, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे. मला पेंग्विन म्हटल्याचा अभिमान आहे. मी जेव्हा पेंग्विन मुंबईत आणले. ते पाहण्यास प्राणी संग्रहालयात अधिकाधिक लोक आले होते आणि त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. तुम्ही पेंग्विन सेना बोलत रहा, आम्ही अशी अनेक काम केली आहेत.  त्याबद्दल देखील बोलत रहा. कोस्टल रोड सेना असं देखील बोलू शकता. अशा शब्दात शिवसेनेचे नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाजप व शिंदे गटातील नेत्यांच्या टीकेवर पलटवार केला.

ट्रेंडिंग न्यूज

Gadchiroli: गडचिरोलीतील धक्कादायक घटना, काळ्या जादूच्या संशयातून २ जणांना जिवंत जाळले; १५ जणांना अटक

Mumbai Fire: मुंबईच्या अंधेरीत गॅस पाइपलाइन लिकेज झाल्याने आग, ४ जण होरपळले; रुग्णालयात उपचार सुरू

Sunday Mega Block 05 May 2024: मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक; कुठून किती वाजता सुटणार लोकल? वाचा

Lok Sabha Elections 2024: काँग्रेसला धक्का! संजय निरुपम यांचा पत्नी आणि मुलीसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

नवरात्र उत्सवानिमित्त आदित्य ठाकरे यांनी आज पुण्यातील सारसबाग समोरील महालक्ष्मी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

टेंभी नाक्यावर जाऊन देवीचे दर्शन घेणार का, या प्रश्नावर बोलताना, उद्धव ठाकरे असतील मी असेन, आम्ही तिथे वर्षानुवर्ष दर्शनाला गेलेलो आहोत. त्याचप्रमाणे रश्मी ठाकरे यांनी टेंभी नाक्यावर जाऊन दर्शन घेतले, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

दरम्यान, रामदास कदम यांनी केलेल्या टीकेबाबत बोलताना, मी त्यांच्यावर कधी बोलतच नाही. माझ्यावर चांगले संस्कार झाले आहेत. चांगल्या गोष्टीबाबत बोलावे. वेडेवाकडे जे आरोप करतात. त्यांच्यावर कधीच बोलू नये, असा खोचक टोला आदित्य ठाकरेंनी कदमांना लगावला.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा