मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Aaditya Thackeray : “महाराष्ट्र पाकिस्तान आहे का? प्रकल्प गुजरातला पळवून लावला”, फडणवीसांना टोला

Aaditya Thackeray : “महाराष्ट्र पाकिस्तान आहे का? प्रकल्प गुजरातला पळवून लावला”, फडणवीसांना टोला

Sep 17, 2022, 08:54 PM IST

    • महाराष्ट्र पाकिस्तान आहे का? प्रकल्प गुजरातला पळवून लावला. महाराष्ट्राच्या मुलांनी काय चूक केली आहे?, असा टोला आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांना लगावला आहे.
आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला

महाराष्ट्र पाकिस्तान आहे का? प्रकल्प गुजरातला पळवून लावला. महाराष्ट्राच्या मुलांनी काय चूक केली आहे?, असा टोला आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांना लगावला आहे.

    • महाराष्ट्र पाकिस्तान आहे का? प्रकल्प गुजरातला पळवून लावला. महाराष्ट्राच्या मुलांनी काय चूक केली आहे?, असा टोला आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांना लगावला आहे.

मुंबई - वेदांत प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर याचे स्पष्टीकरण देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की यासाठी आम्ही शर्थीचे प्रयत्न केले. मात्र गुजरात म्हणजे पाकिस्तान आहे का? आम्ही महाराष्ट्रासाठी याहून मोठे प्रकल्प आणू, या देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी उत्तर दिले आहे. महाराष्ट्र पाकिस्तान आहे का? प्रकल्प गुजरातला पळवून लावला. महाराष्ट्राच्या मुलांनी काय चूक केली आहे?, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Chack:मुंबईत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल देसाईंच्या रोड शोमध्ये पाकिस्तान झेंडा ? व्हायरल व्हिडिचे सत्य उघड

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? शनिवारी व रविवारी 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

Pune Crime News : पुण्यात मुली असुरक्षित! आधी ड्रग्जसोबत दारु पाजली नंतर लॉजवर नेऊन केले कांड! दोघींवर बलात्कार

प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित त्यांना अभिवादन करण्यासाठी आदित्य ठाकरे आज माहीममध्ये आले होते. यावेळी त्यांनी फॉक्सकॉन प्रकल्पावरून शिंदे सरकारसह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

आदित्य म्हणाले की, महाराष्ट्रासाठी कोणी काही बोलायला लागल्यास त्याच्यावर आरोप करायचे, त्याच्या चौकशीची मागणी करून बदनामी करायची. याचा अर्थ म्हणजे महाराष्ट्राचा आवाज बुलंद करणं हा आपल्या देशात गुन्हा झालाय का? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, घटनाबाह्य सरकार स्थापन झाल्यानंतर २६ जुलैला मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलं होतं की वेदांता येणार आहे, ४ लाख कोटी घेऊन येणार आहेत. MIDC च्या मॅगझीनमध्ये सांगितलं की एक लाख कोटी घेऊन येणार आहे. त्यानंतर २९ ऑगस्टला उपमुख्यमंत्री आणि अनिल अग्रवाल यांची भेट झाली. ५ सप्टेंबरला MIDC ने वेदांताला पत्र लिहिलं आहे की आपलं जे काही ठरलंय त्याप्रमाणे एमओयू करायला या. बल्क ड्रग पार्क आपल्या महाराष्ट्रात आला नाही. अन्य प्रकल्पही दुसऱ्या राज्यात गेले.

आदित्या ठाकरेंनी रामदास कदम आणि नारायण राणे यांचे नाव न घेता म्हटले की, माझ्या घरचे संस्कार आहेत की, सत्य बोल. मी अशा टीकांवर लक्ष देत नाही.

वेदांतबाबत चौकशी केली पाहिजे या आशिष शेलार यांच्या वक्तव्यालाचाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी चांगलाच समाचार घेतला. चौकशी कोणाची करणार? केंद्र सरकारची करणार की? अग्रवाल यांची करणार? असा प्रश्न यावेळी आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. प्रकल्प गुजरातला पळवून लावला. महाराष्ट्राच्या मुलांनी काय चूक केली आहे, आजच मी पेपरमध्ये वाचलं इथून प्रकल्प तिथे गेला याचं कोणाला दुःख नाही, याची मला खंत वाटतेय, असा टोला यावेळी आदित्य ठाकरे यांनी लगावला.

पुढील बातम्या