मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Devendra Fadnavis : काँग्रेसच्या बेरोजगारी दिवस मोदींवरील टीकेला फडणवीसांचे प्रत्युत्तर, म्हणाले..

Devendra Fadnavis : काँग्रेसच्या बेरोजगारी दिवस मोदींवरील टीकेला फडणवीसांचे प्रत्युत्तर, म्हणाले..

Sep 17, 2022, 08:14 PM IST

    • नाना पटोलेंचे वक्तव्य गांभीर्याने घेण्याची गरज नाही. पटोल दिवसभर अशा काही-बाही गोष्टी बोलत असतात, त्या गांभीर्याने घ्यायच्या नसतात, असा टोला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लगावला आहे.
देवेंद्र फडणवीस

नाना पटोलेंचे वक्तव्य गांभीर्याने घेण्याची गरज नाही. पटोल दिवसभर अशा काही-बाही गोष्टी बोलत असतात,त्या गांभीर्याने घ्यायच्या नसतात, असा टोला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लगावला आहे.

    • नाना पटोलेंचे वक्तव्य गांभीर्याने घेण्याची गरज नाही. पटोल दिवसभर अशा काही-बाही गोष्टी बोलत असतात, त्या गांभीर्याने घ्यायच्या नसतात, असा टोला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लगावला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज (१७ सप्टेंबर)७२वा वाढदिवससाजरा केला जात आहे. भाजप शासित राज्यांमध्ये यानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.जगातील अनेक नेत्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.एकीकडे मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव होत असतानादुसरीकडे हा दिवस काँग्रेसकडून ‘राष्ट्रीय बेरोजगार दिवस’ म्हणून पाळला जात आहे. त्याचबरोबरकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी देखीलपंतप्रधान मोदी ओबीसी नाहीत, त्यांनी खोटी जात सांगितली असल्याचे म्हणतटीका केली आहे.यावरकाँग्रेसचे आंदोलन व नाना पटोलेंच्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) प्रत्युत्तर दिले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai News : मुंबईकरांचे हृदय नाजुक! तब्बल १७ हजार नागरिकांना उच्चरक्कदाबाचा आजार; तपासणीत धक्कादायक माहिती उघड

Fact Check: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रोड शोमध्ये पाकिस्तानचा झेंडा? हे खरं आहे काय?

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? शनिवारी व रविवारी 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

पटोलेंना असे मध्ये-मध्ये झटके येत असतात - फडणवीस

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस म्हणाले की,नाना पटोलेंचे वक्तव्य गांभीर्याने घेण्याची गरज नाही. पटोल दिवसभर अशा काही-बाही गोष्टी बोलत असतात,त्या गांभीर्याने घ्यायच्या नसतात. त्यामुळे तुम्ही देखील गांभीर्याने घेऊ नका. नाना पटोलेंना असे झटके येत असतात. त्यामुळे ते असे काही बोलत असतात.

काँग्रेसबाबत बोलतानाफडणवीस म्हणाले की,काँग्रेसचे स्थान जनतेतही नाही आणि संसदेतही नाही. त्यामुळेकाँग्रेस आपली जागा शोधत आहे. काँग्रेसचं अस्तित्व कमीकमी होतचाललंआहे. त्यामुळे त्यांनी एकच धोरण अवलंबण्यास सुरुवात केली आहे,ते म्हणजे प्रत्येक गोष्टीला विरोध करणे. देशातील लोकांनी चित्त्यांचं स्वागत केलं आहे. मात्र काँग्रेसमध्ये केवळ नकारात्मकता भरलेली आहे. त्यांनी याला विरोध केला. मिशन चित्ता अंतर्गत आज मोदींच्या वाढदिवसानिमित्त मोदींच्या हस्ते नामिबियातून भारतात आणलेले ८ चित्ते मध्य प्रदेशातील अभयारण्यात सोडले गेले.

काय म्हणाले होते नाना पटोले –

देशातील जनतेला वाटतं आपले पंतप्रधान हे ओबीसी आहेत. पण तसं नाही. काँग्रेसचे प्रवक्ते शक्तीसिंह गोहिल हे लवकरच प्रत्येक राज्यात पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती देणार आहेत. या संदर्भातील सर्व कागदपत्रे ते सादर करणार आहेत. मोदी हे गुजरातमधील श्रीमंत जातींपैकी आहेत. ओबीसी समाजाची मतं मिळवण्यासाठी भाजपनं त्यांना तसं प्रोजेक्ट केलं आहे,'असा आरोपही पटोले यांनी केला.

पुढील बातम्या