मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Aaditya Thackeray: महाराष्ट्राला गाजर नको तर रोजगार हवा, आदित्य ठाकरे केंद्रासह राज्य सरकारवर टीका

Aaditya Thackeray: महाराष्ट्राला गाजर नको तर रोजगार हवा, आदित्य ठाकरे केंद्रासह राज्य सरकारवर टीका

Sep 24, 2022, 09:09 PM IST

    • Aaditya Thackeray: मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधताना आदित्य ठाकरे म्हणाले की, "राज्यात नेमके मुख्यमंत्री कोण मला अद्याप समजत नाही. त्यांच्या खुर्चीत सध्या कोण बसते याचा पत्ता ही त्यांना समजत नाही."
आमदार आदित्य ठाकरे (फोटो - नितीन लवाटे)

Aaditya Thackeray: मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधताना आदित्य ठाकरे म्हणाले की, "राज्यात नेमके मुख्यमंत्री कोण मला अद्याप समजत नाही. त्यांच्या खुर्चीत सध्या कोण बसते याचा पत्ता ही त्यांना समजत नाही."

    • Aaditya Thackeray: मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधताना आदित्य ठाकरे म्हणाले की, "राज्यात नेमके मुख्यमंत्री कोण मला अद्याप समजत नाही. त्यांच्या खुर्चीत सध्या कोण बसते याचा पत्ता ही त्यांना समजत नाही."

शिवसेनेच्यावतीने पुण्यात आज जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यामध्ये आमदार आदित्य ठाकरे हे सहभागी झाले होते. महाराष्ट्राला गाजर नको तर रोजगार हवा आहे. आम्ही सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी पाठपुरावा करत असल्याचंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. महाराष्ट्रातला वेदांतचा प्रकल्प गुजरातला हलवल्याने मोठ्या प्रमाणावर रोजगार गुजरातला गेले. यावरून राज्य सरकारसह केंद्र सरकारवरही आदित्य ठाकरे यांनी टीका केली.

ट्रेंडिंग न्यूज

Maharashtra Weather Update: राज्यात ऊन पावसाचा खेळ! मुंबई, रायगड, ठाणे, सांगली, सोलापूरला उष्णतेची लाट तर विदर्भात पाऊस

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली संभाजीराजेंची माफी; म्हणाले “आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."

Mumbai Local : मुंबईच्या लोकलमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार; नशेखोर तरुणांकडून प्रवाशाची चाकूने भोसकून हत्या

Yavatmal Accident: यवतमाळमध्ये ट्रक आणि ट्रेलरमध्ये भीषण धडक, दोघांचा जागीच मृत्यू, ७० शेळ्या दगावल्या

आदित्य ठाकरे म्हणाले की, आजचा आक्रोश मोर्चा हा सर्वसामान्य तरुणाचा आवाज आहे. राज्यातील आणि मावळातील तरुण यांच्यात सरकारबाबत राग आणि आक्रोश आहे. महाविकास आघाडी सरकार असते तर वेदांत प्रकल्प मावळमध्ये आला असता आणि त्याचा जल्लोष आपण साजरा केला असता. गेल्या दोन ते तीन महिन्यात दिसते तरुणांना रोजगार मिळेल की नाही हा प्रश्न निर्माण झाला असल्याचंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं.

वेदांत प्रकल्प गुजरातला नेल्याचं दु:ख नाही, मात्र महाराष्ट्र प्रगत राज्य आहे आणि आपण आपली जागा निर्माण केलीय. महाराष्ट्रातला प्रकल्प दुसरीकडे हलवणे अयोग्य आहे. राज्याला गाजर नाही तर रोजगार हवाय. प्रकल्प गुजरातला गेल्यानं दोन लाख रोजगार हिरावले गेले. अशी घटना इतर राज्यात घडली असती तर उद्योग मंत्र्यांनी राजीनामा दिला असता असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला.

आदित्य ठाकरे यांनी पुढील जनआक्रोश मोर्चा हा संभाजीनगर इथे होणार असल्याचंही सांगितल.ं मेडीसिन डेव्हिस प्रकल्प तिथून हलवण्यात आला. त्याच्या निषेधार्थच संभाजीनगरमध्ये जनआक्रोश मोर्चा घेण्यात येईल असं ते म्हणाले. वडगाव मावळ येथे जनआक्रोश मोर्चात आदित्य ठाकरे बोलत होते. यावेळी शिवसेना नेते सचीन अहिर, रघुनाथ कुचिक, अनिकेत घुले, गौतम चाबुकस्वार, गजानना थरकुडे उपस्थित होते.

केंद्र सरकार आणि गुजरात सरकारला यासाठी दोष देणार नाही तर खोके सरकारला देणार आहे. आपल्या मुख्यमंत्री यांना हा प्रकल्प माहिती नाही कोठून आला आणि कोठे गेला. मला त्यांनी विचारले असते तर मी त्यांना सांगितले असते ५० खोके द्या आणि ओके करा असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंना टोला लगावला.

मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधताना आदित्य ठाकरे म्हणाले की, राज्यात नेमके मुख्यमंत्री कोण मला अद्याप समजत नाही. वेदांत यांची गुंतवणूक पावणे दोन लाख कोटींची होती आणि मुख्यमंत्री यांना याची कल्पना नाही कारण त्यांनी विधानसभेत कंपनीबाबत खोटी माहिती दिली. त्यांच्या खुर्चीत सध्या कोण बसते याचा पत्ता ही त्यांना समजत नाही."

खोके सरकारने तरुणाचे स्वप्न धुळीस मिळवण्याचे काम केले आहे. सेनेने प्रथम रोजगार प्रश्न हाती घेतला आणि त्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी साथ दिली. सध्याच्या सरकारने महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. मुख्यमंत्री दिल्लीत जाऊन स्वतःला काय मिळणार पाहतात परंतु राज्याला काय मिळणार हे तिथे जाऊन विचारत नाहीत. कोरोना काळात ही आम्ही साडेसहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणली असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा