मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Chandrakant Khaire : ‘ती बाई पिक्चरमध्ये सिगारेट पिते, कसले फोटो काढते अन् आम्हाला शहाणपणा शिकवते?’

Chandrakant Khaire : ‘ती बाई पिक्चरमध्ये सिगारेट पिते, कसले फोटो काढते अन् आम्हाला शहाणपणा शिकवते?’

Sep 06, 2022, 03:40 PM IST

    • Chandrakant Khaire On Navneet Rana : 'तू ठाकरे है, तो मै भी राणा हूं, मुंबई की लडकी, विदर्भ की बहूँ हूं', असं म्हणत खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर शेलक्या शब्दांत टीका केली होती. आता त्याला शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
Chandrakant Khaire On Navneet Rana (HT)

Chandrakant Khaire On Navneet Rana : 'तू ठाकरे है, तो मै भी राणा हूं, मुंबई की लडकी, विदर्भ की बहूँ हूं', असं म्हणत खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर शेलक्या शब्दांत टीका केली होती. आता त्याला शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

    • Chandrakant Khaire On Navneet Rana : 'तू ठाकरे है, तो मै भी राणा हूं, मुंबई की लडकी, विदर्भ की बहूँ हूं', असं म्हणत खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर शेलक्या शब्दांत टीका केली होती. आता त्याला शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

Chandrakant Khaire On Navneet Rana : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर एकेरी उल्लेख करून टीका केल्यानंतर आता शिवसेनेकडूनही त्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना ''तू ठाकरे है, तो मै भी राणा हूं, मुंबई की लडकी, विदर्भ की बहूँ हूं', अशी शेलक्या शब्दांत टीका केली होती. त्यानंतर आता त्यांना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Traffic Update : पुणेकरांनो घराबाहेर पडण्याआधी हि बातमी वाचा! मेट्रोच्या कामासाठी शिमला ऑफिस चौकात वाहतुकीत बदल

Pune Police : पुण्यात पुन्हा एकदा गुन्हेगारांची धिंड! हजारहून अधिक अट्टल गुन्हेगारांना पोलिस ठाण्यात उभे करत दिली तंबी

Maharashtra Weather Update: राज्यात ऊन पावसाचा खेळ! मुंबई, रायगड, ठाणे, सांगली, सोलापूरला उष्णतेची लाट तर विदर्भात पाऊस

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली संभाजीराजेंची माफी; म्हणाले “आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."

औरंगाबादमधील एका कार्यक्रमात बोलताना माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले की, जी बाई पिक्चरमध्ये सिंगारेट ओढते, कसले कपडे घालते, ती आता आम्हाला हनुमान चालिसाचं महत्त्व सांगणार? ती आम्हाला शहाणपणा शिकवणार?, तिच्याविषयी आमच्याकडे कुणी बोलूच नये, असे सवाल विचारत त्यांनी खासदार नवनीत राणांवर टिकास्त्र सोडलं आहे. याशिवाय अमित शहा हे राक्षसी वृत्तीनं काम करत असल्याची टीका त्यांनी केली आहे. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबईत येऊन उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. त्यानंतर खैरेंनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

नवनीत राणांनी तोंड संभाळून बोलावं- शिवसेना

खासदार नवनीत राणा यांनी ठाकरेंविषयी बोलताना तोंड सांभाळून बोलावं, असा सज्जड दम शिवसेनेच्या प्रवक्त्या संजना घाडी यांनी राणांना दिला आहे. मुंबईची मुलगी सी ग्रेड चित्रपटं करण्यात व्यस्त होती, त्यामुळं तिला मातोश्री आणि बाळासाहेबांचा इतिहास काय माहिती असणार? राणा आता उभ्या राहून कमळाबाईची सुपारी वाजवत असल्याचं संपूर्ण महाराष्ट्राला कळलंय, अशी टीका संजना घाडी यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर केली आहे.