मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dasara Melava: दसरा मेळावा घेण्याचा अधिकार कुणाला?; रावसाहेब दानवेंनी मांडला ‘हा’ तर्क

Dasara Melava: दसरा मेळावा घेण्याचा अधिकार कुणाला?; रावसाहेब दानवेंनी मांडला ‘हा’ तर्क

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 06, 2022 02:54 PM IST

Raosaheb Danve On Shiv Sena Dasara Melava : दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटात सुरू असलेल्या संघर्षावर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.

Raosaheb Danve Support CM Eknath Shinde On Dasara Melava
Raosaheb Danve Support CM Eknath Shinde On Dasara Melava (HT)

Raosaheb Danve Support CM Eknath Shinde On Dasara Melava : शिवसेना आणि शिंदे गटात दसरा मेळावा घेण्यावरून राजकीय संघर्ष निर्माण झाला आहे. कारण काही दिवसांपूर्वी शिवसेनेनं मुंबई महापालिकेकडे दसरा मेळाव्याला परवानगी मिळावी म्हणून अर्ज केला होता. परंतु शिवसेनेला बीएमसीकडून अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. याशिवाय शिवाजी पार्कवर आम्हीच दसरा मेळावा घेणार असं म्हणत शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी महापालिकेकडे मेळाव्याच्या परवानगीसाठी अर्ज केला होता. त्यानंतर आता या सर्व घडामोडींवर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी भाष्य केलं आहे.

माध्यमांशी बोलताना मंत्री दानवे म्हणाले की, शिवसेनेच्या ज्या गटाकडे ४० आमदार आणि १२ खासदार आहेत, त्या गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याचा अधिकार आहे, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दसरा मेळाव्यावरून पाठिंबा देताना उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

उद्धव ठाकरेंनी केवळ आम्हालाच नाही तर जनतेलाही धोका दिला असून त्यांना गृहमंत्री अमित शहांनी मुख्यमंत्रीपदाबाबत कोणताही शब्द दिलेला नव्हता, त्यांनी मोदींच्या नावानं मतं मागून भाजपला धोका दिल्याची टीका दानवे यांनी ठाकरेंवर केली आहे.

ठाकरेंची काय ती डायलॉगबाजी- दानवे

ठाकरेंनी अडीच वर्षात कोणतीही कामं केली नाहीत. ते अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिले पण मंत्रालयात गेले नाहीत आणि आता ते डायलॅागबाजी करतायंत. गवताला भाले फुटतील, केसाला भाले फुटतील, काय ती ठाकरेंची डायलॉगबाजी...असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणाची खिल्ली उडवत त्यांच्यावर टीका केली आहे.

IPL_Entry_Point