मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ramdas Kadam : भास्कर जाधवांवर बोलताना रामदास कदमांची जीभ घसरली, म्हणाले...

Ramdas Kadam : भास्कर जाधवांवर बोलताना रामदास कदमांची जीभ घसरली, म्हणाले...

Mar 19, 2023, 04:31 PM IST

    • Ramdas Kadam Live Today : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज खेडमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. त्यापूर्वीच ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या आहेत.
Ramdas Kadam vs Bhaskar Jadhav (HT)

Ramdas Kadam Live Today : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज खेडमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. त्यापूर्वीच ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या आहेत.

    • Ramdas Kadam Live Today : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज खेडमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. त्यापूर्वीच ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या आहेत.

Ramdas Kadam vs Bhaskar Jadhav : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच रत्नागिरीच्या खेडमध्ये जाहीर सभा घेत भाजपसह शिंदे गटावर तुफान टीका केली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज खेडमध्ये जाहीर सभा होणार आहे. त्यामुळं सभेपूर्वीच ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगलेल्या आहे. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी शिंदे गटावर टीका केली होती. त्यानंतर आता शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भास्कर जाधव यांच्यावर बोलताना शिवराळ भाषेचा वापर केला आहे. त्यामुळं आता ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार राजकीय राडा रंगण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Sharad Pawar News: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

Beed News : बीडमध्ये चंदन तस्करी... निवडणुकीच्या धामधुमीत दोन कोटींचे चंदन जप्त; नगरसेवकच निघाला 'पुष्पा'

MHADA News : मुंबईतील ‘या’ उपनगरात घर मिळवणे झाले सोपे; म्हाडाने बदलला नियम, आता लागणार फक्त दोन कागदपत्रे

मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी; पण मराठी लोकांनी येऊ नये, महिला HR च्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप

शिंदे गटाचे नेते रामदास कदम माध्यमांशी बोलताना म्हणाले की, आमची खेडमधील सभाच अजून झालेली नाही. सभा होऊद्या, त्यानंतर बघू. भास्कर जाधव हा सारखा कुत्र्यासारखा भुंकतोय. आम्हाला त्याच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये. तोल गेल्यामुळं त्याच्या पायाखालची वाळू सरकली असून आता मी त्याच्या मतदारसंघात लक्ष घालतोय. निवडणुकीला दोन वर्षे बाकी असून त्याला गाडल्याशिवाय मी राहणार नाही. त्यामुळं भास्कर जाधवच्या भुंकण्याकडे आम्ही लक्ष देत नसल्याचं सांगत रामदास कदम यांनी भास्कर जाधवांवर बोलताना शिवराळ भाषा वापरली आहे.

भास्कर जाधवची औकात नाही. त्याची निवडून येण्याची लायकी नाही, त्याला मी गाडणारच आहे. तो एकदम नीच माणूस असून त्याचा मेंदू सडलेला आहे. त्याला उपकाराची अजिबात जाणीव नाहीये. माझ्यावर बोलताना तो वाटेल ते बडबडतोय. ज्या थाळीत खातो त्यात छेद करणारा भास्कर जाधव हा नालायक माणूस आहे, अशा शिवराळ भाषेत रामदास कदमांनी भास्कर जाधवांवर टीका केली आहे.