मराठी बातम्या  /  Maharashtra  /  Bjp Will Contest All Seats In Vidhan Sabha And Lok Sabha In Maharashtra Says Chandrakant Patil In Pune Today

जागावाटपावरून भाजप-शिंदे गटातील संघर्ष शिगेला; भाजपच्या बड्या नेत्याचा स्वबळाचा इशारा

Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis
Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis (HT_PRINT)
Atik Sikandar Shaikh • HT Marathi
Mar 19, 2023 04:10 PM IST

BJP vs Shinde Group : विधानसभेच्या २८८ आणि लोकसभेच्या ४८ जागा आम्ही स्वबळावरच लढणार असल्याचं वक्तव्य भाजपच्या बड्यानं नेत्यानं केलं आहे. त्यामुळं यावरून सत्ताधाऱ्यांमध्ये संघर्ष पेटण्याची चिन्हं आहेत.

Chandrakant Patil On Shinde Group : महाविकास आघाडीत जागावाटपाचं सूत्र ठरल्यानंतर आता सत्ताधारी भाजप-शिंदे गटात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील जागावाटपावरून जोरदार संघर्ष पेटला आहे. आम्ही २४० जागा लढवणार असून शिंदे गटाला ४८ जागा देण्यात येणार असल्याचं वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं होतं. त्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांनी त्यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला होता. त्यानंतर आता भाजपा नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यात भाजपच्या स्वबळाचा नारा दिला आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत भाजप सर्वच्या सर्व जागा लढवणार असल्याचं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केल्यामुळं आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, एक निवडणूक पार पडली की दुसऱ्या निवडणुकीच्या तयारीला भाजप लागत असते. त्यामुळं गेल्या अनेक महिन्यांपासून आम्ही विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकांची तयारी केली आहे. लोकसभेच्या संपूर्ण ४८ आणि विधानसभेच्या २८८ जागा भाजप स्वबळावर लढवणार असल्याचा दावा चंद्रकांत पाटलांनी केला आहे. शिंदे गटाच्या वाट्याला किती जागा येतील, हे आताच ठरवण्याचं कारण नाही. त्यांना आमचीच तयारी उपयोगी पडणार असल्याचं सांगत चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला हाणला आहे.

५० जागा घ्यायला आम्ही मूर्ख आहोत का?- शिंदे गट

जागावाटपाचा अंतिम निर्णय वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत घेतला जाईल. भाजपच्या नेत्यांनी त्यापूर्वीच वक्तव्य करून नवा वाद पेटवू नये. विधानसभा निवडणुकीत फक्त ५० जागा घ्यायला आम्ही मूर्ख नाही, असं म्हणत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी भाजपवर टीका केली आहे. तर दुसरीकडे जागावाटपात शिंदे गटाला १४० जागा देण्याची मागणी आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे.

WhatsApp channel