मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Gautami Patil Video : डान्स सुरू असतानाच पत्र्याचं शेड कोसळलं, गौतमी पाटीलच्या कार्यक्रमातील धक्कादायक प्रकार

Gautami Patil Video : डान्स सुरू असतानाच पत्र्याचं शेड कोसळलं, गौतमी पाटीलच्या कार्यक्रमातील धक्कादायक प्रकार

May 09, 2023, 09:32 AM IST

    • Gautami Patil Dance : नृत्यांगणा गौतमी पाटीलचा डान्स सुरू असतानाच स्टेजसमोरील पत्र्याचं शेड कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Gautami Patil Lavni Dance (HT)

Gautami Patil Dance : नृत्यांगणा गौतमी पाटीलचा डान्स सुरू असतानाच स्टेजसमोरील पत्र्याचं शेड कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

    • Gautami Patil Dance : नृत्यांगणा गौतमी पाटीलचा डान्स सुरू असतानाच स्टेजसमोरील पत्र्याचं शेड कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Gautami Patil Dance In Mahalgaon Vaijapur : प्रसिद्ध लावणी डान्समुळं महाराष्ट्रात फेमस झालेली नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा राडा झाल्याची घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातल्या महालगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या गौतमीच्या कार्यक्रमात पत्र्याचं शेड कोसळल्याची घटना घडली आहे. गौतमीचा डान्स पाहण्यासाठी तरुणाईची गर्दी उसळली होती. त्यावेळी शेड कोसळल्याची घटना घडल्यामुळं त्यात काही तरुण जखमी झाल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वीच गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात झाड कोसळल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता महालगावातील कार्यक्रमात पत्र्याचं शेड कोसळलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Sunday Mega Block 05 May 2024: मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक; कुठून किती वाजता सुटणार लोकल? वाचा

Lok Sabha Elections 2024: काँग्रेसला धक्का! संजय निरुपम यांचा पत्नी आणि मुलीसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Mumbai Metro : लोकसभा निवडणुकीत मतदान करा अन् मिळवा...; मुंबई मेट्रोची खास ऑफर!

Parbhani Murder: हॉटेलमध्ये नाश्ता देण्यावरून वाद, ग्राहक तरुणाची हत्या, तिघांविरोधात गुन्हा दाखल!

महालगावात नेमकं काय झालं?

संभाजीनगर जिल्ह्यातील महालगावात गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गौतमी पाटीलचा कार्यक्रम असल्यामुळं परिसरातील तरुणांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. त्यावेळी गौतमीला पाहण्यासाठी काही तरुण स्टेजसमोरील पत्र्याच्या शेडवर चढले. काही वेळ झाल्यानंतर अचानक पत्र्याचं शेड खाली कोसळलं. त्यामुळं दहा ते वीस लोक एकमेकांच्या अंगावर पडले. या घटनेत काही तरुणांना किरकोळ मार लागल्याची माहिती आहे. त्यानंतर उपस्थितांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी झालेल्या तरुणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. त्यामुळं आता गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा राडा झाल्यामुळं संताप व्यक्त केला जात आहे.

सांगली जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात छत कोसळल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला होता. तसेच कोल्हापुरात गौतमी पाटीलला पाहण्यासाठी तरुणांनी गर्दी केल्यामुळं पत्र्याचं शेड कोसळलं होतं. त्यानंतर आता महालगावातील गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा शेड कोसळल्याची घटना समोर आल्यामुळं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्यामुळं आता गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी होण्याची शक्यता आहे.