मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Indian Railway : मध्य रेल्वेची मालवाहतुकीतून घसघशीत कमाई, तब्बल ७७१ कोटींचा महसूल जमा

Indian Railway : मध्य रेल्वेची मालवाहतुकीतून घसघशीत कमाई, तब्बल ७७१ कोटींचा महसूल जमा

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 07, 2023 10:50 PM IST

central railway : मध्य रेल्वेने मालवाहतुकीतून घसघशीत कमाई केली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा एप्रिल महिन्यात ३.९१ टक्के महसुलात वाढ झाली आहे.

revenue of central railway from freight
revenue of central railway from freight

central railway Revenue : मध्य रेल्वेने मालवाहतुकीतून घसघशीत कमाई केली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा एप्रिल महिन्यात ३.९१ टक्के महसुलात वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यात एकूण ७४.२ लाख टन मालाची वाहतूक करण्यात आली. त्यातून रेल्वेला ७७१.५० कोटी रुपयांचे महसूल मिळाले. गेल्यावर्षी एप्रिलमध्ये मध्य रेल्वेची मालवाहतूक ७१.४ लाख टन होती. त्यातून ७१५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते.

रेल्वेच्या उत्पन्नात यावर्षी एप्रिलमध्ये ७.९ टक्के वाढ होऊन ते ७७१.५० कोटी रुपयांवर पोहोचले आहे. सिमेंट आणि क्लिंकरची (सिमेंटचे उपउत्पादन) वाहतूक एप्रिलमध्ये २४३ रेक (इंजिन वगळता मालगाडी) झाली. गेल्या वर्षी ती १७८ रेक होती.

रेल्वेतून वाहनांची वाहतूक गेल्या वर्षी एप्रिलमध्ये ६६ रेक होती. यंदा एप्रिलध्ये ती वाढून ९५ रेकवर पोहोचली आहे. कंटेनरची वाहतूकही ९.९ टक्क्यांनी वाढून ६५७ रेकवरून ७२२ रेकवर पोहोचली आहे. पेट्रोलियम उत्पादनांची वाहतूकही १८२ वरून २०१ रेकवर पोहोचली आहे. खतांची वाहतूक वाढून ५७ वरून ९० रेक झाली आहे. लोह आणि पोलादाची वाहतूक मागील वर्षी एप्रिल महिन्यात ९३ रेक होती. यंदा एप्रिलमध्ये ती १५९ रेकवर गेली आहे. लोह खनिजाची वाहतूकही ४४ वरून ७३ रेकवर पोहोचली आहे.

 

रेल्वेच्या प्रतिकिलोमीटर प्रतिटन मालवाहतुक क्षमतेत एप्रिलमध्ये ३.२१ टक्के वाढ झाली आहे,अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.

 

IPL_Entry_Point

विभाग